esakal | काळ्या फुग्यांची कर्नाटक पोलिसांना धास्ती 
sakal

बोलून बातमी शोधा

black bubbles karnataka police

खडे बाजार पोलिस स्थानकात युवा समितीचे कार्यकर्ते व पोलिस अधिकारी यांची बैठक पार पडली

काळ्या फुग्यांची कर्नाटक पोलिसांना धास्ती 

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : काळ्या दिनी निषेध नोंदविण्यासाठी आकाशात काळे फुगे सोडण्याच्या आवाहनाची  कर्नाटक पोलिसांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. गुरुवारी पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांना बोलावून एक नोव्हेंबर रोजी काळे फुगे व पतंग आकाशात सोडू नका अशा सूचना करत कार्यकर्त्यांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरू केला.


खडे बाजार पोलिस स्थानकात युवा समितीचे कार्यकर्ते व पोलिस अधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी पोलिस निरीक्षक धिरज शिंदे यांनी निषेध नोंदविण्यासाठी काळे फुगे आकाशात सोडू नये तसेच समितीचे वरिष्ठ अधिकारी जो निर्णय घेतील त्या प्रमाणे त्या दिवशी कार्यक्रमात भाग घ्यावा असे सांगत कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवा समितीचेअध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, समितीचे कार्यकर्ते अनेक वर्षे लोकशाहीच्या मार्गाने लढा देत असून या पुढेही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन केले जाणार आहे, मराठी भाषिकांकडून काळ्या दिनी कायद्याच्या चौकटीत राहून निषेध नोंदवला जाणार आहे. 

हे पण वाचा - मोठी बातमी; भारतातील पहिला शस्त्रक्रिया प्रयोग कोल्हापुरात 

यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सचिव श्रीकांत कदम, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीवेळी चंद्रकांत पाटील, रोहित गोमानाचे, रोहन लंगरकांडे, अश्वजित चौधरी, सूरज कुडूचकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

हे पण वाचा - आई-वडील शेतात गेल्याची संधी साधून बालिकेवर अत्याचार

गेल्या काही दिवसांपासून समितीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या मार्गाने एक नोव्हेंबर रोजी निषेध नोंदविण्याची तयारी करीत असून सोशल मीडियावरून काळ्या दिनाबाबत जनजागृती केली जात आहे. यालाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर दडपशाही सुरू केली आहे. मात्र कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती जो निर्णय घेईल त्या प्रमाणे निषेध नोंदविण्याचा निर्धार केला आहे

.  

संपादन - धनाजी सुर्वे 

go to top