esakal | Good News :नव्या शिक्षकांना बीएलओचे आदेश ; दहा वर्षाच्या कामातून मुक्तता 

बोलून बातमी शोधा

BLO orders new teachers kolhapur jaysingpur}

शहरातील खासगी प्राथमिक आणि नगरपालिका शाळेतील शिक्षकांकडून आठ ते दहा वर्षापासून बीएलओचे काम करुन घेतले जात होते

Good News :नव्या शिक्षकांना बीएलओचे आदेश ; दहा वर्षाच्या कामातून मुक्तता 
sakal_logo
By
गणेश शिंदे

जयसिंगपूर : शहरातील खासगी प्राथमिक आणि नगरपालिका शाळातील 39 शिक्षकांना बीएलओचे (बुथ लेव्हल ऑफिसर) आदेश सोमवारी लागू केले. शिरोळच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी हे आदेश लागू केले. आठ ते दहा वर्षापासून बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांना यातून वगळल्याने त्यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

शहरातील खासगी प्राथमिक आणि नगरपालिका शाळेतील शिक्षकांकडून आठ ते दहा वर्षापासून बीएलओचे काम करुन घेतले जात होते. आपल्यालाच वर्षानुवर्षे ही कामे करावी लागत असून अन्य शिक्षकांना मात्र या कामापासून अलिप्त ठेवले जात असल्याची भावना या शिक्षकांमधून निर्माण झाली होती. परिणामी जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्‍यातील बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. 

नोव्हेंबर 2020 मध्ये या शिक्षकांनी या कामाविरोधात आवाज उठवला होता. यापुढे कोणत्याही निवडणूकीचे काम करणार नसल्याचा पवित्रा घेतला. याबाबतचे निवेदनही तहसिलदारांना दिले होते. मात्र, तहसिलदारांनी शिक्षकांना दिलासा देण्याची भूमिका घेत लवकरच बीएलओच्या कामातून मुक्त करण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीच्या कामातही बीएलओंनी प्रशासनाला मदत केली होती. जयसिंगपूरचे तलाठी अमोल जाधव यांनी तहसिलदारांचे आदेश शाळांतील शिक्षकांना लागू केले. नवीन मतदारांच्या नोंदी, मृत मतदारांची नावे कमी करणे, दुबार मतदारांची नावे कमी करणे अशा प्रकारची निवडणूकीच्या संबंधित कामे हे शिक्षक आठ-दहा वर्षापासून करत होते. 

याआधीच्या तहसिलदारांनी या शिक्षकांना आश्‍वासने देत वेळ मारुन नेण्याचे काम केले होते. मात्र, तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी सध्या बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षकांना दिलासा देत इतर शिक्षकांना या कामात सामावून घेतल्याने गेल्या आठ-दहा वर्षापासून काम करणाऱ्या शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

हे पण वाचाअन्यथा महापालिकेला टाळे ठोकण्याचे आंदोलन ; संभाजी ब्रिगेडचा  इशारा

तहसिलदारांनी शब्द पाळला 
नोव्हेंबर 2020 मध्ये बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षकांनी कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. अनेक वर्षापासून आपल्याला केवळ आश्‍वासने मिळत आहेत. प्रत्यक्षात आमची या कामातून सुटका होत नसल्याची कैफियतही शिक्षकांनी मांडली होती. तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी मात्र, विधानसभेनंतर आपली या कामातून मुक्तता नक्की करु असा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळल्याची भावना शहरातील बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.  कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर 

 संपादन - धनाजी सुर्वे