गुजरातहून आणला मृतदेह अन् कर्नाटकच्या सिमेवरच करावे लागले अंत्यसंस्कार...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

मृतदेहांची अवहेलना थांबेना...

कोगनोळी (बेळगाव) - गुजरातमध्ये निधन झालेल्या युवकाच्या मृतदेहावर कोगनोळी येथील गायरानात अधिकारी व नातेवाईकांच्या उपस्थितीत आज (ता. २०) अंत्यसंस्कार करण्यात आले.तरूण अशोक खेमलापुरे (वय २३, रा. बेल्लद बागेवाडी) असे मयत युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तरुण हा गुजरातमध्ये नोकरी करत होता. दोन दिवसांपूर्वी अचानक तब्येत बिघडल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नातेवाईक व वडील अशोक खेमलापुरे यांनी मृतदेह बेल्लद बागेवाडीला नेण्याचे ठरवले. गुजरातहून महाराष्ट्र व तेथून कोगनोळी येथील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर ते मृतदेहासह आले. मात्र कर्नाटकात प्रवेश दिला जात नसल्याने या ठिकाणीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाचा - विपरीतच घडलं ! तिने सायरनचा आवाज ऐकला अन् तिच्या जिवाच झालं वाईटच...

येथील गायरानामध्ये वडील अशोक खेमलापुरे यांनी साश्रुनयनांनी मुलाला अग्नी दिला.यावेळी चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक, तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे, निपाणी नगरपालिकेचे आयुक्त महावीर बोरण्णावर, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, उजळाईवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकांत शिरगुप्पे उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या डोळ्यात पाणी

वडील अशोक खेमलापुरे यांनी अग्नी देऊन आक्रोश केला. तो पाहून येथे उपस्थित अधिकाऱ्यांच्या डोळ्यात देखील पाणी आले.पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक यांनी त्यांचे सांत्वन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bodies brought from Gujarat had to be cremated on the border of Karnataka