विपरीतच घडलं ! तिने सायरनचा आवाज ऐकला अन् तिच्या जिवाच झालं वाईटच...

अशोक तोरस्कर
बुधवार, 20 मे 2020

गतप्राण झालेल्या शर्वरीची करुण कथा ; आर्दाळ परिसर हळहळला.

उतूर (कोल्हापूर) - काही वर्षापुर्वी तिच्या मोठ्या भावाचे निधन झाले. यानंतर अपघातात वडील वारले.या दोन्ही घटना तिच्या बालमनावर परिणाम करणा-या ठरल्या. कुठेही खट्ट झालं तरी तिचा जिव कासावीस व्हायचा,ती घाबरुन जायची. सोमवारी सायंकाळी अधिका-यांची गाडी सायरन वाजवत गावात आली.काही तरी घडलय म्हणून ती जिन्यातून टेरेसवर धावत सुटली.तिला धाप लागली तिचा जिव घुटमळून ती घामाघूम झाली.तिला उपचाराकरीता दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेले. मात्र ती गतप्राण झाली आणि या घटनेमुळे सारा गाव हळहळला...

तिच्या बाल मनावर झालता आघात 

आर्दाळ (ता.आजरा) येथील शर्वरी विलास बाबर (वय१५) ही  शाळकरी मुलगी. शर्वरी हि आरदाळच्या माध्यमिक विद्यालयात इयत्ता ९वी च्या वर्गात शिकत होती.साधी  , समंजस व मितभाषी मुलगी. शर्वरीच्या लहानपणी तीच्यापेक्षा मोठा असलेला भाऊ शशांक याचे काही वर्षापुर्वी  निधन झाले.पाठोपाठ ३-४ वर्षाने वडीलांचा  उतूर  जवळ अपघातात मृत्यु झाला. या दोन्ही घटनांचा तिच्या बाल मनावर आघात  करणा-या ठरल्या. यानंतर शर्वरी छोट्या छोट्या धक्यानेही घाबरुन चक्कर येऊन कोसळू लागली. अशा ४-५ वेळा घटना घडल्या मात्र  त्यावेळी प्राथमिक उपचाराने ती शुद्धीवर येऊन बरी व्हायची.

वाचा - खळबळजनक  ! विलगीकरण कक्षातून झोपण्यासाठी जात होते ते घरी.....

सोमवारी  दिवसभर गावाशेजारी असलेल्या हालेवाडी येथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने गाव १००% लाॅकडाऊन होते. गावात निरव शांतता होती. यानंतर आरदाळ गावातील दोन कोरोना संशयीताना घेवून जाण्यासाठी अँब्युलन्स गावात आली.यामुळे ग्रामस्थ भितीच्या छायेखाली होते. गावातील परिस्थीचा आढावा घेण्यासाठी तालुक्यातील अधिकारी  सायरन वाजवत गावात आले. रात्रीच्या शांत काळात सायरनचा आवाज  लोकांच्या मनात भिती निर्माण करणारा ठरला. यावेळी शर्वरीलाही या सायरनच्या  भिती वाटली व ती जिन्यावरुन धावत टेरेसवर असणा-या  आपल्याआईकडे धावत सुटली. आणि थोड्या वेळ्यात आपल्याला कसेतरी होतयं असं म्हणत बेशुद्ध पडली. यापुर्वी देखील अशाप्रकारे ती बेशुद्ध पडली होती. तीला प्राथमिक उपचार केल्यावर पुन्हा लगेच ती शुद्धीवर यायची. तसे उपचार तीच्या आईने सुरु केले.जिन्यावरुन पळत आल्यामुळे लागलेला दम व भितीने वाढलेली तीच्या ह्रदयाची धडधड यामुळे ती शुद्धीवर न येता बेशुद्धच झाली. तीला खाजगी वहानाने गडहिंग्लज येथे दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तेथे पोहण्यापुर्वीच तीची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. तिच्या निधनाची बातमीने सारा गाव हळहळला.

आई एकटीच...

शर्वरीच्या आकस्मित जाण्याने शर्वरीच्या आईच्या वाट्याला एकटेपण आले. आधी पुत्र नंतर पती आणी आता मुलगी नियतीने हिरावुन नेली. त्याना आधार देणारे शर्वरीचे काका कोरोनामुळे मुंबईतून येवू शकले नाहीत. यामुळे त्याना तीचे अंत्यदर्शन घेता आले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Listen sound of the siren and she began to feel uneasy