Book Gift Of Rs 20,000 For Prisoners Kolhapur Marathi News
Book Gift Of Rs 20,000 For Prisoners Kolhapur Marathi News

कैद्यांची वाचनाची भूक भागविण्यासाठी अशीही धडपड...

गडहिंग्लज : चांगले वाचन जीवनाला दिशा देणारे ठरते. त्यासाठी आवश्‍यक वाचन साहित्य सर्वसामान्य व्यक्तींना उपलब्ध होईल. पण, विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी ते मिळविताना मोठी अडचण. ही अडचण दूर करण्याच्या उद्देशाने येथील निवृत्त शिक्षक श्रीकांत नाईक यांनी जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील (कळंबा) कैद्यांसाठी 20 हजार रुपये किमतीचे ग्रंथ भेट दिले; तर चिमणे व उत्तूर (ता. आजरा) येथील वाचनालयांनाही स्वत:च्या ग्रंथालयातील 30 हजार रुपये किमतीची पुस्तके दिली आहेत. 

श्रीकांत नाईक यांची साहित्यप्रेमी अशी ओळख आहे. त्यांच्याकडून वाचन चळवळ वाढीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि सुसंस्कारित पिढी घडावी, या उद्देशाने त्यांनी यापूर्वी "श्‍यामची आई' या पुस्तकाच्या एक लाख 35 हजार प्रती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविल्या आहेत. "एक होता कार्व्हर' या पुस्तकाच्या दोन हजार प्रती भेट दिल्या आहेत. आर्दाळ, पेंढारवाडी, महागोंड, उत्तूर, चिमणे, झुलपेवाडी, औरनाळ, माद्याळ येथील वाचनालयांना प्रत्येकी 200 पुस्तके भेट दिली आहेत. लग्न समारंभ, वास्तुशांत, मुंज, वाढदिवसानिमित्तही ग्रंथभेट देण्याचा शिरस्ता कित्येक वर्षांपासून पाळला आहे. 

आता कळंबा कारागृहातील कैद्यांसाठी 20 हजार रुपये किमतीची पुस्तके भेट दिली आहेत. नाईक व त्यांच्या पत्नी अनुराधा नाईक यांनी कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांच्याकडे ही पुस्तके सुपूर्द केली. तसेच चिमणे येथील वाचनालयाला व उत्तूर येथील वाचनालयाला प्रत्येकी 15 हजार रुपयांची पुस्तके भेट दिली आहेत. वाचन चळवळ वाढीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com