कोल्हापूर हद्दवाढीचा फेरप्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडे

bowdry increased proposal sent to state government of kolhapur city
bowdry increased proposal sent to state government of kolhapur city

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा फेरप्रस्ताव महापालिकेने आज राज्य सरकारकडे पाठविला. या प्रस्तावावर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची स्वाक्षरी झाल्यानंतर राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा हद्दवाढीचा चेंडू आता राज्य शासनाकडे गेला आहे. राजकीय उदासीनता आणि ग्रामीण विरोधामुळे इतकी वर्षे रखडलेल हद्दवाढीचा प्रश्‍न त्यामुळे पुन्हा एकदा ज्वलंत होणार आहे.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आठ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी महापालिकेत बैठक घेऊन हद्दवाढीचा फेरप्रस्ताव देण्याची सूचना केल्यानंतर या विषयाची नव्याने चर्चा सुरू झाली. महापालिकेने फेरप्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केले होते. गेले दीड महिना यावर खल झाला. महासभेने ११ जून २०१५ ला मंजूर केलेल्या ठरावाप्रमाणेच नवा प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावात १८ गावे आणि दोन औद्योगिक वसाहतींचा समावेश आहे. 


असे घडतील बदल

  • २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ः ५ लाख ५० हजार ५४१ 
  • प्रस्तावित गावांची एकत्रित लोकसंख्या - एक लाख १६ हजार ८७३ 
  • हद्दवाढीनंतर एकूण लोकसंख्या ः सुमारे सात लाख ६७ हजार ४१४ 
  • महापालिकेचे वार्षिक दरडोई उत्पन्न - ३८६५.७५ रुपये 
  • नव्याने सामील होणाऱ्या गावांचे एमआयडीसीसह - ५०४.२४ रुपये 
  • हद्दवाढीनंतर शहराचे एकूण वार्षिक दरडोई उत्पन्न - ३००२ रुपये 
  • महापालिकेचे विद्यमान क्षेत्र - ६६.८२ चौरस किलोमीटर
  • हद्दवाढीनंतर होणार वाढ - १२३.११ चौरस किलोमीटर
  • नव्याने होणारे क्षेत्र - १८९.९३ चौरस किलोमीटर


फेरप्रस्तावातील गावे

फेर प्रस्तावात शहरालगतचे शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, नवे बालिंगे, वाडीपीर, मोरेवाडी, पाचगाव, कळंबे तर्फ ठाणे, शिरोली, उचगाव, शिंगणापूर, गोकुळ शिरगाव, नागाव, वळीवडे, गांधीनगर, मुडशिंगी, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एम.आय.डी.सी. यांचा समावेश आहे. प्रस्तावात शहरालगतच्या गावांच्या लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेऊन त्यांचा समावेश केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com