मुदत संपलेल्या 31 ग्रामपंचायतींवर शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंते प्रशासक

सदानंद पाटील
Wednesday, 5 August 2020

कोल्हापूर  : मुदत संपलेल्या 31 ग्रामपंचायीतंवर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी प्रशासकांची नियुक्‍ती केली आहे. प्रशासक निवडीसाठी पुरेसे कर्मचारी नसल्याने या पदावर शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी सांख्यिकी आदींची निवड झाली आहे. 

कोल्हापूर  : मुदत संपलेल्या 31 ग्रामपंचायीतंवर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी प्रशासकांची नियुक्‍ती केली आहे. प्रशासक निवडीसाठी पुरेसे कर्मचारी नसल्याने या पदावर शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी सांख्यिकी आदींची निवड झाली आहे. 
ग्राम विकास विभागाने या पदावर योग्य व्यक्‍तीची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रितसर प्रक्रियेने या निवडी केल्या आहेत. 
ज्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत त्यांची माहिती पुढीलप्रमाणे, सावर्डे बड्याचीवाडी (ता.राधानगरी) ग्रामपंचायतीत प्रशासक म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता राजाराम खोचरे यांची नियुक्‍ती केली आहे. 
तालुकानिहाय ग्रामपंचात व नियुक्ती अशी, 
शाहूवाडी तालुका ः परळे कोदे व उकोली- शाखा अभियंता नौशाद मोरे, पणुंद्रे- कृषी विस्तार अधिकारी अभिजित गावडे, पेरीड/गाडेवाडी - विस्तार अधिकारी पंचायत सुधाकर इंगोले, ससेगाव - कनिष्ठ अभियंता अशोक ओतारी, थेरगाव - कनिष्ठ अभियंता मंगेश कुडवे, वारुळ -पर्यवेक्षिका विद्या कुरणे. 

आजरा तालुका - चिमणे - विस्तार अधिकारी पंचायत डी.डी.माळी. 

भुदरगड तालुका - गंगापूर - पर्यवेक्षिका पदमजा पी पाटील. नितवडे - शाखा अभियंता धनाजी कुंभार. पाळ्याचा हुडा - कनिष्ठ अभियंता आरती वायचळ. बामणे- विस्तार अधिकारी सांख्यिकी,बापु घस्ती. भेंडवडे -पर्यवेक्षिका आर. एस.भोसले, शिवडाव, शिवडाव खुर्द-विंजोळे- शाखा अभियंता धनाजी कुंभार, सोनुर्ली- सहाय्यक अभियंता जयश्री देवकर. 

गडहिंग्लज तालुका ः औरनाळ,कानडेवाडी, तुपुरवाड व नौकुड -विभागीय अधिकारी कृषी एस. एच. जज्जरवार, बेळगुंदी व इंचनाळ- विभागीय अधिकारी एस. एम. घुले. गिजवणे - के. एन. खटावकर, हरळी बुद्रक - विभागीय अधिकारी कृषी के. एस. गवई. मुंगूरवाडी - शाखा अभियंता आर. के. मिनिजिस. निलजी - शिक्षण विस्तार अधिकारी रमेश कोरवी, सावतवाडी नेसरी - पर्यवेक्षिका सुमित्रा कोरवी, शेंद्री, मिना नागरगोजे. उंबरवाडी - शाखा अभियंता श्रीमती हिडदुगी. 
गगनबावडा तालुका - गगनबावडा - विभागीय अधिकारी कृषी एस. ए. गायकवाड व लोंघे - पर्यवेक्षिका एस. एस. जाधव.

 

संपादन यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Branch Engineer, Junior Engineer Administrator on 31 expired Gram Panchayats