तुम्ही सगळे कोल्हापूरचे ब्रॅंड अँबॅसिटर: भूषण गगराणी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020


ब्रॅंड कोल्हापूर सन्मान सोहळ्यात समाज रत्नांचा सत्कार 

कोल्हापूर  : स्वतःच्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व तुम्हा प्रत्येकाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. खऱ्या अर्थाने तुम्ही प्रत्येक जण या कोल्हापूरचे ब्रॅंड अँबॅसिटर आहात असे गौरवोद्गार राज्याच्या नगररचना विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी ब्रॅंड कोल्हापूर या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी काढले. या वेळी पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील उपस्तित होते. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या 98 मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 

श्री गगराणी पुढे म्हणाले कि, कला,क्रीडा, सांस्कृतिक , विज्ञान , संशोधन ,शिक्षण असे कोणतेही क्षेत्र असो कोल्हापूर कधीही मागे नाही आहे. प्रत्येक गोष्ट हि कोल्हापूर मध्ये प्रथम होते हे या कोल्हापूरचे वैशिट्य आहे. मग तो इंग्रजांविरुद्धच्या उठाव असो अथवा पहिले ऑलम्पिक मेडल सर्वच गोष्टी कोल्हापूरातूनच होतात. येथे बसलेले प्रत्येक जण देखील स्वतःच्या क्षेत्रात सर्वोत्तमला गवसणी घातलेले आहेत. प्रत्येकाच्या यशामध्ये त्याच्या जन्मभूमी चां वाटा असतोच असतोच.कोल्हापूरची प्रतिमा सशक्त बनवण्यासाठी ब्रॅंड कोल्हापूर उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा- वॉशिंग मशिन दुरुस्तीच्या बहाण्याने बेशुद्ध करून दागिने लुटणाऱ्या दोघांना अटक -

जगभरात कोठेही कौतुक झालं तरी आपल्या मातीत कौतुक हे सर्वाधिक प्रेरणा देणार असतं. कोल्हापुरकर जे काही करतात ते मनापासून करतात या मुळेच प्रत्येकजण अधिकाधिक यशस्वी होतो. येथील उद्योजक देखील नवीन निर्मितीच्या ध्यासाने काम करणारे सांगत त्यांनी स्वतःच्या कोल्हापूरच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पार्श्वभूमी सांगताना आमदार सतेज पाटील यांनी ब्रॅंड कोल्हापूर या उपक्रमाची ओळख करून देताना आपल्या लोकांना आपल्या लोकांनी सन्मानित करण्यासाठी त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुढील कार्याला प्रेरणा देण्यासाठी केलेला उपक्रम असल्याचे सांगत ब्रॅंड कोल्हापूरच्या सर्व पॅनल मेम्बर्स आभार मानले.

आमदार ऋतुराज पाटील यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना सन्मानित सर्वांच्या यशाबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये संशोधन, शोध प्रबंध,सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम, चित्रपट क्षेत्रातील योगदान,कला क्षेत्रातील जागतिक सन्मान, फुटबॉल वाढीसाठी प्रचार व प्रसार, दुर्ग भ्रमंती आणि गिर्यारोहण तसेच क्रीडा क्षेत्रातील खेलो इंडिया स्पर्धेत चमकदार कामगिरी करत यश संपादित केलेल्यांचा ब्रॅंड कोल्हापूर म्हणून स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brand Kolhapur event by kolhapur