ब्रेकिंग - कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा खुरप्याने वार करुन खून

brothers murder in kolhapur bidri
brothers murder in kolhapur bidri
Updated on: 

बिद्री (कोल्हापूर) : येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा खुरप्याने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (दि.१७) रोजी संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून मारुती आनंदा बारड ( वय ३८ ) असे मयताचे नाव आहे. तर संशयित आरोपी मोहन आनंदा बारड याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
  

 याबाबत मुरगूड पोलिस व घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, मारुती व मोहन हे दोघे सख्खे भाऊ आई वडिलांसह बिद्री येथे राहतात. त्यांचे मुळ गाव राधानगरी तालुक्यातील बारडवाडी असून वडील व्यवसायाच्या निमित्ताने गेली चाळीस वर्षे बिद्रीत भाड्याने राहतात. या दोघा भावात कौटुंबिक वादातून वारंवार भाडंणे होतात होती.

सोमवारी सायंकाळी  साडेसात वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. गावातीलच मारुती महिपती चौगले यांच्या सोनारकी नावाच्या शेतातील घरामध्ये मोहन याने मारुती बारड याच्यावर रागाच्या भरात खुरप्याने वार केले. यामध्ये मारुतीच्या छातीवर डाव्या बाजूस वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद बिद्रीचे पोलिस पाटील रमेश  ढवण यांनी मुरगूड पोलिसांत दिली असून संशयित आरोपी मोहन बारड याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सपोनि विद्या जाधव करत आहेत.

 संपादन- धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com