चंदगड, आजऱ्यात बीएसएनएलचा दोन दिवसांपासून खेळखंडोबा

BSNL Service Disturbed In Chandgad And Ajara Kolhapur Marathi News
BSNL Service Disturbed In Chandgad And Ajara Kolhapur Marathi News
Updated on

चंदगड : चंदगड व आजरा तालुक्‍यात गेले दोन दिवस बीएसएनलच्या सेवेचा खेळखंडोबा सुरू आहे. इंटरनेट सेवा पूर्णतः कोलमडली असून संवाद सुरळीत होत नाहीत. दर एक मिनिटीला सेवा सुरळीत होणे आणि लगेचच खंडीत होणे असे प्रकार होत असल्याने ग्राहकातून तीव्र नाराजीचा सूूर आहे. कंपनीने त्वरीत सेवा सुरळीत करावी अशी मागणी आहे. 

गुरुवारी (ता. 19) दुपारी साडे बारा वाजल्यापासून सेवा खंडीत होण्याचा प्रकार सुरु झाला. त्या दिवशी सायंकाळी चारच्या सुमारास सेवा सुरु झाली. त्यानंतर पुन्हा साडे पाच वाजता खंडीत झालेली सेवा दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता सुरू झाली. परंतु त्यात नियमितता नव्हती. दर मिनिटीला सेवा खंडीत होण्याचा प्रकार सुरू होता. इंटरनेट सेवा, तर दिवसभर बंदच राहिली. यामुळे परगावातील व्यक्तीशी संपर्क साधणे अवघड झाले.

नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने संपर्कावर मर्यादा आल्या. अलिकडच्या काळात बीएसएनएलची सेवा चांगली म्हणून हजारो ग्राहकांनी अन्य कंपनीचे मोबाईल क्रमांक बीएसएनएलमध्ये रूपांतरीत केले होते. परंतु गेल्या दोन दिवसापासून कंपनीकडून सेवेचा जो खेळखंडोबा सुरू आहे त्यामुळे ग्राहक वैतागले आहेत. बहुतांश ग्राहकांनी प्रिपेड सेवा स्विकारलेली आहे. कंपनीने त्यांना खंडीत सेवेचा कालावधी भरून द्यावा, तसेच त्वरीत सेवा सुरळीत करावी, अशी मागणी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satej Patil on Gokul election politics
Kolhapur Crackdown: Former Corporator Booked After Raid on Video Parlour
Ichalkaranji on Edge After Alleged Abuse Case Involving Minor Girls; Police Tighten Security
Rohini Devaba World Wrestling Championship
Marathi News Esakal
www.esakal.com