esakal | कागल मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
sakal

बोलून बातमी शोधा

Burning of a symbolic statue of Karnataka Chief Minister Yeddyurappa in Kagal

कर्नाटक शासनाने छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवून मराठी जनतेला डिवचण्याचा प्रयत्न केला....

कागल मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

sakal_logo
By
नरेंद्र बोते

कागल - मनगुत्ती (जि.बेळगांव) येथे बसविण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन येथील बसस्थानकाजवळील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुध्यक्ष शिवानंद माळी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.यावेळी कर्नाटक सरकारचा व भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा निषेध करून नवीद मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवरायांचा पुतळा जोपर्यंत बसविला जात नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील. निवडणुका आल्यानंतर भाजपकडून स्टंट केला जातो.

वाचा - स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे यांनी दिला राजीनामा 

शिवानंद माळी म्हणाले, भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या बद्दल अपशब्द काढले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता दुखावली गेली आहे. त्यातच कर्नाटक शासनाने छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवून मराठी जनतेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
आंदोलनात शहराध्यक्ष संजय चितारी, पंकज खलिफ, बॉबी बालेखान, विजय दाभाडे, विक्रम कोरवी, राहुल गाडेकर आदींनी सहभाग घेतला.

संपादन - मतीन शेख