बेळगाव - रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी तुमच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेण्यास सांगतो असे म्हणत डॉक्टरकडून दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गोकाक येथे ५ जुलैला ही घटना घडली असून या प्रकरणी बुधवार ( ता.8) गोकाक शहर पोलिस ठाण्यात भीमशी बरमन्नावर आणि हणमंत दुर्गन्नावर (दिघेही रा.गोकाक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. श्रीशैल मल्लिकार्जुन होसमनी ( वय 65, रा. नवजीवन हॉस्पिटल गोकाक) यांनी फिर्याद दिली आहे.
हे पण वाचा - ब्रेकिंग - सुपारी किलरला झाली कोरोनाची लागण
याबाबत दिलेल्या फिर्यादिनुसार, दोन्ही संशयित आरोपी ५ जुलैला होसमनी यांच्या दवाखान्यात गेले होते. त्यावेळी या दोघांनी गोपाळ रामचंद्र हरिजन (रा. उपारट्टी) याने आपल्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणी तुमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यात फिर्यादिला राजी करतो. पण त्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी त्यांनी केली. त्यावेळी पैसे देण्यात डॉक्टरने विरोध करताच अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देखीक देण्यात आली. त्यामुळे त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक ए. टी. अम्मीनभावी अधिक तपास करीत आहेत.
संपादन - धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.