
कोल्हापूर : स्वतःचा जीव धोक्यात घालायचा, सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडायचे. रात्रीअपरात्री एखाद्याचा कॉल येऊ दे, त्याला नकार द्यायचा नाही. मानवी वस्तीत आलेल्या सर्पांना पकडण्याचे काम सर्पमित्रांनीच करावे, असा अलिखित नियम आकाराला आला आहे. त्यातूनच सर्पमित्रांसमोरील अडचणींचा डोंगर वाढत आहे.
सुरक्षित साधनांविना त्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. सर्पमित्राचे काम हौशी असले तरी जिवावर बेतणारे आहे. एखाद्याच्या घरात साप आल्यानंतर त्याला योग्यरित्या पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम सर्पमित्रांतर्फे केले जाते. त्यांची त्या त्या परिसरात सर्पमित्र म्हणूनच ओळख तयार झाली आहे.
विषारी-बिनविषारी साप पकडण्यात त्यांचे कौशल्य आहे. वस्तुतः साप पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याची जबाबदारी वनखात्याची आहे. या खात्याकडून साप पकडण्यासाठी दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधल्यास कोणीच कॉल स्वीकारत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
जिल्ह्यात 2019 ला आलेल्या महापुरानंतर सापांना पकडण्यासाठी काही सर्पमित्र एकत्र आले. जिल्हा सर्पमित्र संघटना त्यांनी स्थापन केली. एक व्हाट्सऍप ग्रुप करून त्यावर सर्पमित्रांच्या मागण्यांची दखल वनखात्याने घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरू केले.
कागदोपत्री सर्पमित्रांची संख्या दोनशेहून अधिक आहे. केवळ 70 ते 75 सर्पमित्र सक्रिय आहेत. पदरमोड करून ते सर्पमित्रांना वाचविण्याची काम करत आहेत. वनखात्याने त्यांना ओळखपत्र न देताच ते काम करतात.
"सापाला पकडण्याचे काम अवघड आहे. सर्पमित्र ते नि:स्वार्थीपणे करत आहेत. सर्पमित्रांची दखल विभागाने घ्यायला हवी. त्यांना ओळखपत्र देऊन त्यांचा विमा उतरवण्याची तरतूदही करावी.
-प्रवीण खांडेकर, करवीर रेस्क्यू ग्रुप.
सर्पमित्र कशाचीही अपेक्षा न बाळगता प्रामाणिकपणे काम करतात. वनखात्याने पुण्यातील सर्पमित्रांना ओळखपत्र दिले होते. मात्र, त्यातील काही सर्पमित्र सापाची तस्करी करत असल्याचे निदर्शनास आले. परिणामी वनखात्याने परीक्षा घेऊनच ओळखपत्र द्यावे. वर्षभरातील सर्पमित्रांच्या कामगिरीचे मूल्यमापन करावे.
- देवेंद्र भोसले, सदस्य, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.