कोल्हापूरात यंदाचा गणेशोत्सव 'असा' साजरा करण्याचे पोलिस यंत्रणेकडून आवाहन

celebrate this year's Ganeshotsav through plasma and blood donation activities in kolhapur
celebrate this year's Ganeshotsav through plasma and blood donation activities in kolhapur

कोल्हापूर - प्लाझ्मा, रक्तदान शिबीरासह शासकीय यंत्रणेला व्हॅल्टीनेटर भेट अशा विधायक उपक्रमातून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिस यंत्रणेकडून जिल्ह्यातील गणेश मंडळांना केले जात आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. गणेश आगमनावेळी होणाऱ्या शहरातील गर्दीवर मैदानाचा पर्याय पुढे आला आहे. त्यावर गुरूवारी संबधित घटकांची बैठक घेतली जाणार आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. 

कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मंडळांनी पुढाकार घेतला आहे. शासनानेही या उत्सवासाठी नियमावली तयार केली आहे. त्याची अमलंबजावणी पोलिस यंत्रणेकडून केली जाणार आहे. नियमावलीत गणेश मूर्तीची उंची पासून सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून मिरवणूक, देखावे आदीवर घालण्यात आलेल्या मर्यादेचे पालन सार्वजनिक गणेश मंडळांना करावे लागणार आहे. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शहरातील तालीम मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चार दिवसापूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. आजही त्यांनी इचलकरंजी, जयसिंगपूर, वडगाव, हुपरी या गावातील मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी कोरोनाच संकट विचारात घेऊन मंडळांनी प्लाझ्मा, रक्तदान यासारख्या शिबीराचे आयोजन करा. गरजू मुलांना दत्तक घ्या. वैद्यकीय यंत्रणेला ऑक्‍सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर भेट देण्याचे विधायक उपक्रम राबवा असे आवाहन केले. असे उपक्रम राबविण्याची इच्छा अनेक मंडळांनी यावेळी व्यक्त केली. 

एक गाव एक गणपतीची सक्ती करण्यात आलेली नाही. तरीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर मंडळे सहभागी होत आहेत. अनेक गावांनी कोरोना संकटामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचेही पोलिस यंत्रणेला कळविले आहे. दरम्यान शहरातील गणेश आगमना दिवशी पापाची तिकटी, गंगावेश, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅंम्प आदी भागात होणाऱ्या गर्दीचे नियोजनसाठी परिसरातील मैदानाचा पर्याय पुढे आला आहे. सासने मैदान, दुधाळी, गांधी मैदान, पेटाळा अशी मैदाने उपलब्ध आहेत. याबाबत संबधित घटकांशी गुरुवारी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

  • जिल्ह्यातील गावांची संख्या - 1029 
  • गणेश मंडळांची संख्या - 4576 
  • एक गाव एक गणपती उपक्रमात सहभागी गावे - 303 
  • सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करणारी गावे - 97 

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com