आम्ही कोल्हापुरी,  ही आमची जबाबदारी...! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

सेलीब्रिटींनी केले कोल्हापूरकरांना आवाहन... 

कोल्हापूर - "मी कोल्हापुरी, आता माझी जबाबदारी... मी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही... शिंकताना, खोकताना काळजी घेईन...'' असे आवाहन आता कलापूरच्या सेलीब्रिटीज्‌नी केले आहे. याबाबतचा व्हिडिओ आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल झाला आहे. "कोंडाजी बाबा' फेम अभिनेता आनंद काळे, "तुझ्यात जीव रंगला' फेम अभिषेक कुलकर्णी, अमोल नाईक, "वैजू नंबर वन' फेम अभिनेत्री सोनाली पाटील, अभिनेत्री हेमल इंगळे, अभिनेता देवेंद्र चौगुले, अभिनेता संजय मोहिते, "जीव झाला वेडापीसा' फेम विदुला चौगले, शर्वरी जोग, विकास पाटील आदींचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

काय म्हणतात, सेलीब्रिटी ? 

मी कोल्हापुरी, आता माझी जबाबदारी 

 • मी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही 
 • शिंकताना, खोकताना काळजी घेईन... 
 • मी माझे हात सतत साबणाने धुईन 
 • मी सोशल मीडियावरून येणाऱ्या अफवांवर विश्‍वास ठेवणार नाही आणि त्या पुढे पसरवणार नाही 
 • एखाद्यात कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्याचा तिरस्कार करणार नाही 
 • मी त्यांना मानसिक आधार देईन, योग्य ती दिशा दाखवीन 
 • मी पौष्टिक आहार घेईन, व्यायाम करीन आणि माझी रोगप्रतिकार शक्ती वाढवेन 
 • मी प्रशासनाच्या, आरोग्य विभागाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करेन 
 • मी गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही, घराबाहेर पडणार नाही 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrities appeal to Kolhapurkar