आजऱ्यात गणेश मूर्तिदान करणाऱ्यांना मिळाले "हे' प्रमाणपत्र, वाचा नगरपंचायतचा उपक्रम

Certificates Were Given To Those Who Donated Ganesha Idols In Ajara Kolhapur Marathi News
Certificates Were Given To Those Who Donated Ganesha Idols In Ajara Kolhapur Marathi News
Updated on

आजरा : येथे व तालुक्‍यात गणरायाला भावपूर्ण व शांततेच्या वातावरणात निरोप देण्यात आला. विशेषतः कोणतीही मिरवणूक, वाद्याचा गजर व आतषबाजी दिसून आली नाही. नगरपंचायत प्रशासनाने शहरात राबविलेल्या मूर्तिदान उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला. मूर्तिदान करणाऱ्या दात्यांना या वेळी प्रोत्साहन म्हणून कोविड योद्धा प्रमाणपत्र देण्यात आले. तहसील कार्यालयाजवळ मूर्तिदान उपक्रमाची सुरवात तहसीलदार विकास अहिर, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांच्या हस्ते झाली. 

मूर्ती वाहून नेण्यासाठी रथ ठेवला होता. वेळापत्रकानुसार शहरातील प्रत्येक गल्लीत रथ फिरविण्यात आला. अनेक नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मूर्ती दान केल्या. येथील हिरण्यकेशी घाटावर मूर्तिदान उपक्रमांतर्गत नगरपंचायतीच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. शिवाजीनगरच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन कार्यात मदत केली. यासाठी हिरण्यकेशी नदीत प्रशासनाच्या मदतीने 15 फूट लांबीचा तराफा बांधून विधीवत मूर्तीचे विसर्जन झाले.

चित्री नदीत वडाचा गोंड व संताजी पुलाजवळ घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. आजरा तालुक्‍यात उत्तूर, पेरणोली, गवसे, वाटंगी, मलिग्रे, किणे, कोळिंद्रे, भादवण, मुमेवाडी, वडकशिवाले, बहिरेवाडी, महागोंड, गवसे, एरंडोळ, पोळगाव, बेलेवाडी, चिमणे, हालेवाडी, मडिलगे, खेडे, पेद्रेवाडी, कोवाडे, निंगुडगे, सरोळी, सरंबळवाडी, कानोली, सिरसंगी, वेळवट्टी, देवर्डे यासह तालुक्‍यातील विविध गावांत भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. 

नगरपंचायतीचे कौतुक 
येथील नगरपंचायतीने शहरातील समूह संसर्ग पाहता मूर्तिदान उपक्रम राबविला. मूर्तिदान करणाऱ्या दात्यांना या वेळी प्रोत्साहन म्हणून कोविड योद्धा प्रमाणपत्र देण्यात आले. तालुका प्रशासन, नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com