'बचके रेहेना रे बाबा, तुझपे नजर हें' ; सोशल मीडियावर चॅलेंज स्वीकारणं ठरु शकतं धोक्याच !

challenges on social media dangerous to our family members also said pune police
challenges on social media dangerous to our family members also said pune police

कोल्हापूर : लॉकडाउनमध्ये व्यक्त होण्याचे प्रभावी साधन ठरलेल्या सोशल मीडियावर विविध चॅलेंजेस्ची नेहमीच रेलचेल असते. ही चॅलेंज स्वीकारून नसती फजिती होण्याचे प्रकारही घडत आहेत. कपल चॅलेंजने सुरू झालेला हा ट्रेंड सध्या बियर्ड, फादर चॅलेंजेस पासून ते सिंगलपर्यंत आला आहे. मात्र, असे हे चॅलेंज स्वीकारणे धोक्‍याचे ठरू शकण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

नेटिझन्सच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजे सोशल मीडिया. लॉकडाउनमध्ये अनेकांनी छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली. यापाठोपाठ महिलांनी साडी चॅलेंज, तर पुरुषांनी फेटा चॅलेंजही घेतले. मग यानंतर नथीचा नखरा, मिशीचा ताव असे चॅलेंज पूर्ण होतंच सध्या सोशल मीडियावर हॅशटॅग कपल चॅलेंजचा ट्रेंड धुमाकूळ घालत आहे. या चॅलेंजचा ट्रेंड इतका वाढला आहे की, यावर विविध मिम्सही तयार होत आहेत.

आता पर्यंत १० लाखाहून अधिक लोकांनी या चॅलेंजमध्ये सहभाग घेतला आहे. या वरूनच चॅलेंजची लोकप्रियता समजून येते. मात्र, या क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वतःच्या खासगी आयुष्यातील क्षणांना असे सोशल मीडियावर जाहीर करणे धोकादायक ठरू शकत असल्याचा इशाराही दिला आहे. यामुळे चॅलेंज करणे आणि स्वीकारणे दोन्ही गोष्टी काही प्रमाणात अडचणीचे ठरू शकते.

पुणे पोलिसांचा इशारा 

घराच्या व्यक्तीचा फोटो असे सोशल मीडियावर टाकणे जिकिरीचे असून, त्या फोटोचा गैरवापर होऊन खासगी जीवनात आणि सामाजिक जीवनात अनाहूत बदल घडू शकतात. त्यामुळे असे चॅलेंज स्वीकारण्याचा मोह टाळण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी ट्‌विटरवरून केले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com