सलग आठवडाभर चंदगडला दिलासा

Chandgad Has Not Had A Single Corona Peshant During The Week Kolhapur Marathi News
Chandgad Has Not Had A Single Corona Peshant During The Week Kolhapur Marathi News
Updated on

चंदगड : सामान्य माणसाच्या अंगाचा थरकाप उडवणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेने सध्या मोकळा श्‍वास घेतला आहे. गेल्या आठवडाभरात तालुक्‍यात एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. अडीच महिन्यांत 75 रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी 60 रुग्णांवर स्थानिक कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केल्यानंतर ते बरे झाले. उर्वरित रुग्णांवर कोल्हापूर येथे उपचार करण्यात आले. तालुक्‍यात 1300 जण संस्थात्मक क्वारंटाइन असून सर्वांची प्रकृती उत्तम आहे.

मृत्यूचे प्रमाणही शून्य राहिल्याने आरोग्य यंत्रणा कौतुकास पात्र ठरली आहे. 
सुरवातीच्या दोन महिन्यांत या विभागात एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. त्यानंतरच्या काळातही स्थानिक एकाही व्यक्तीला या रोगाची बाधा झाली नाही; परंतु नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात अडकलेले स्थानिक ग्रामस्थ गावाकडे आले. त्यापैकी अनेकांना या रोगाची बाधा झाली होती.

सुरवातीला एक-दोन संख्येत आढळणारे रुग्ण नंतर दोन अंकी संख्येत बदलले. पंधरा-वीस दिवसांत तालुक्‍यात 75 बाधित रुग्णांची नोंद झाली; मात्र मृत्यूचे प्रमाण शून्य राहिले. बाधित रुग्णांवर चंदगड येथील कोरोना केअर सेंटरमध्ये आणि काहींवर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार केल्यानंतर ते सर्व जण बरे झाले. तालुक्‍यासाठी ही बाब दिलासादायक ठरली. 

यासाठी तालुक्‍यातील आरोग्य यंत्रणा, तालुका आरोग्य खात्याची सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी, त्यांना मदत करणारा स्टाफ, स्थानिक पातळीवर सर्वेक्षण करणाऱ्या आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका, दक्षता समिती यांचे कष्ट महत्त्वाचे ठरले. नंतरच्या काळात तालुक्‍यातील खासगी डॉक्‍टरांनीही मदतीचा हात दिला. महसूल प्रशासनाचीही मदत झाली. 

दक्षता घ्यावी लागणार
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा रोग आटोक्‍यात आणण्यास मदत झाली; परंतु रोगाचा प्रादुर्भाव पाहता यापुढेही काही काळ दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. 
- डॉ. आर. के. खोत, तालुका आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com