"या' तालुक्‍यात दहा दिवसात दुसऱ्यांदा पूर... बंधारे, पाण्याखाली; वाहतूक झाली ठप्प 

In Chandgad Taluka Floods For The Second Time In Ten Days Kolhapur Marathi News
In Chandgad Taluka Floods For The Second Time In Ten Days Kolhapur Marathi News
Updated on: 

चंदगड : तालुक्‍यात दहा दिवसात दुसऱ्यांचा पूर आला आहे. दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने घटप्रभा व ताम्रपर्णी नदीचे पाणी धोक्‍याच्या पातळीवरुन वाहत आहे. दोन्ही नदीवरील मिळून दहा बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे. येथील ताम्रपर्णी पूलावर पाणी आल्याने हेरे, तिलारीनगरकडे जाणारी वाहतूकही बंद झाली आहे. 

या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलग तीन दिवस जोरदार पावसाने पूर आला होता. त्यानंतरही सातत्याने पाऊस सुरूच होता. गेले दोन दिवस पुन्हा जोर धरल्यामुळे नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. अनेक ठिकाणी नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ताम्रपर्णी नदीवरील कोकरे, कोनेवाडी, हल्लारवाडी, कोवाड तसेच घटप्रभा नदीवरील पिळणी, भोगोली, हिंडगाव, कानडी, अडकूर, गणुचीवाडी हे बंधारे काल रात्रीच पाण्याखाली गेले आहेत. येथील ताम्रपर्णी पूल तसेच इब्राहीमपूरचा घटप्रभा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. 

ओढ्यांचे पाणी पात्राबाहेर पडून शिवारात घुसले आहे. त्यामुळे नदीकाठची पिके पाण्यात आहेत. दहा दिवसापूर्वीच्या पुरात बुडालेली पिके तग धरत असतानाच पुन्हा एकदा पुर आल्यामुळे ही पिके कुजण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. वादळाने पडलेला ऊस सुध्दा पुराच्या पाण्यात बूूडून कुजण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान आज पहाटेपर्यंत कोवाड आणि माणगाव मंडल वगळता उर्वरीत चंदगड, नागनवाडी, तुर्केवाडी व हेरे मंडलमध्ये अतिवृष्टी नोंदवली आहे. हेरे मंडलमध्ये सर्वाधिक 131 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने हेरे, जंगमहट्टी, कलिवडे येथे घराच्या भिंती कोसळून 2 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर दाटे नजीक पुराचे पाणी येण्याची शक्‍यता आहे. 

संपादन - सचिन चराटी 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com