राज्यस्तरीय स्पर्धेत चंदगडची "पॉज' एकांकिका प्रथम

ऋषिकेश राऊत
Saturday, 2 January 2021

राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या बाविसाव्या वर्षी साई नाट्यधारा, चंदगड या संस्थेच्या "पॉज' या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळविला.

इचलकरंजी : राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या बाविसाव्या वर्षी साई नाट्यधारा, चंदगड या संस्थेच्या "पॉज' या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळविला. आमचे आम्ही, पुणे या संस्थेच्या "लव्ह इन रिलेशनशिप' या एकांकिकेने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेतील तृतीय क्रमांक समांतर, सांगली या संस्थेच्या "समांतर' या एकांकिकेने मिळविला. मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्‍लब ऑफ सेंट्रल यांच्यातर्फे स्पर्धा आयोजित करण्यात आली. 

स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचे सादरीकरण लक्षात घेऊन आपलं घर, नगर या संघाची "दोरखंड' आणि एस. एम. प्रॉडक्‍शन, पुणे या संघाच्या "37 गुण' या एकांकिकांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले. त्याचबरोबर गायन समाज देवल क्‍लब, कोल्हापूर या संघाच्या "काय राव' या एकांकिकेस लक्षवेधी एकांकिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभ कोल्हापूरचे प्रसिद्ध रंगकर्मी संजय हळदीकर आणि मनीष मुणोत, तसेच परीक्षक विजयकुमार नाईक (गोवा), राज कुबेर (पुणे) आणि प्राची गोडबोले (सांगली) यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी समीर गोवंडे, शामसुंदर मर्दा, संजयसिंह गायकवाड उपस्थित होते. 

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये परसू गावडे यांना दिग्दर्शन प्रथम, प्रणव जोशी द्वितीय, तर मोनिका बनकर यांना तृतीय क्रमांक मिळाला. पुरुष अभिनयासाठी अपूर्व स्वराज यांना प्रथम, परसू गावडे यांना द्वितीय, सागर बंडगर यांना तृतीय क्रमांक मिळाला. महेश गवंडी, प्रतीकेश मोरे, युवराज ओतारी, मनू शर्मा, मयुरेश पाटील यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले. स्त्री अभिनयासाठी वैशाली पाटील यांना प्रथम, नीतू साहनी यांना द्वितीय, शुभांगी जाधव यांना तृतीय क्रमांक मिळाला. निहारिका तांबे, वैष्णवी शेटे, श्‍वेता कुलकर्णी, नयना सातपुते, जान्हवी माने यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले.

उत्कृष्ट विनोदी अभिनयासाठी अभिजित वाईकर आणि ज्योती पांडे यांची निवड झाली. उत्कृष्ट नवीन संहितेचा पुरस्कार इरफान मुजावर (समांतर, सांगली) यांनी मिळविला. उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार समीक्षा संकपाळ हिने प्राप्त केला. स्पर्धेतील उत्कृष्ट वाचिक अभिनय पुरस्कार धनंजय जोशी आणि सौजन्या घंटे यांनी प्राप्त केले. तांत्रिक विभागात रोहन घोरपडे यांना पार्श्वसंगीत प्रथम, तर अमित साळुंखे व संदेश खेडेकर यांना द्वितीय पुरस्कार मिळाला. प्रकाश योजनेसाठी प्रथम आणि द्वितीय दोन्ही पुरस्कार श्‍याम चव्हाण यांना मिळाले.

आविष्कार ठाकूर यांना नेपथ्य प्रथम आणि यशोधन गडकरी यांना द्वितीय क्रमांक मिळाला. उत्कृष्ट रंगभूषा पुरस्कार अक्षय सुतार, तर उत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार वंदना गणू यांना मिळाला. महाराष्ट्राच्या विविध भागांतील 42 संघांनी विविध आशयाच्या एकांकिका उत्तमरीत्या सादर केल्या. संजय होगाडे यांनी प्रास्ताविक केले. पंडित ढवळे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष आबाळे यांनी आभार मानले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandgad's "Pause" One-Act Play First In The State Level competition Kolhapur Marathi News