देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना भेटायला कोरोनाची गरज नाही; चंद्रकांतदादांचा खोचक टोला

chandrakant patil comment on ajit pawar corona infection
chandrakant patil comment on ajit pawar corona infection

कोल्हापूर - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना एकाच वेळी कोरोना झाला. या वाक्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांना जरी एकाच वेळी कोरोनाची लागण झाली असली तरी, ते दोघे वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. फडणवीस शासकीय रुग्णालयात आहेत. तर अजित पवार खासगी रुग्णालयात उपचार घेतात. कोरोना रुग्णाला कोणालाही भेटता येत नाही आणि त्या दोघांना भेटण्यासाठी कोरोना होण्याची आवश्यकता नाही,  असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  आज पत्रकार परिषदेत लगावला.


दरम्यान, पाटील यांनी यावेळी मराठा आरक्षणावरही आपले मत मांडले. ते म्हणाले, ''9 सप्टेंबरला मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आज 48 दिवस झाले तरी सरकारने आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठ फारसे काही केले नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलवून बैठकीचे नाटक करण्यात आले. पण नंतर याबाबतची आमच्यासोबत एकही बैठक झाली नाही. मागास आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती गायकवाड यांनाही सरकारने विश्‍वासात घेतले नाही. स्थगिती उठावी यासाठी न्यायालयामध्ये प्रयत्न करणे गरेजेचे होते. ज्या नोकऱ्यांमध्ये निवडण्याची प्रक्रिया झाली असून केवळ नियुक्तीपत्र देणे बाकी आहे. त्यांना तरी या स्थगितीतून सूट मिळावी यासाठी सरकारने न्यायालयाला विनंती केली पाहीजे होती. पण यातील काहीच झाले नाही. सुनावणी आधी दोन दिवस वकील, ऍडव्होकेटजनगरल, मंत्री यांनी दिल्ली जाणे आवश्‍यक आहे. सरकार कोणतीही पूर्वतयारी करत नाही. त्यामुळे वारंवार अपयश येते.''

दसऱ्याचे नव्हे शिमग्याचे भाषण  

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात महाराष्ट्रातील एकही प्रश्‍न नव्हता. केवळ विरोधकांना शिव्या, शाप देणारे ते भाषण होते. राज्यपालासारख्या घटनाधिष्टीत पदाचाही सन्मान ठाकरे यांनी भाषणात ठेवला नाही. विरोधकांना शिव्या देणारेच त्यांचे भाषण हे दसऱ्याचे नव्हते तर शिमग्याचे होते. असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com