esakal | पवारांनीच सर्कस असल्याचे केले मान्य ! चंद्रकांत पाटील यांची राजनाथसिंह-पवार वादात उडी 
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil criticism on sharad pawar

दोन दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्य सरकारवर आरोप करताना राज्यात सर्कस चालू असल्याची टीका केली होती.

पवारांनीच सर्कस असल्याचे केले मान्य ! चंद्रकांत पाटील यांची राजनाथसिंह-पवार वादात उडी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - राज्यात सर्कस आहे आणि त्यात प्राणीही आहेत असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्यात सर्कस चालू असल्याचे मान्य केले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज केली. 

पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरातील विविध भागात सॅनिटायझर स्टॅंडसह इतर वस्तुंचे वाटप त्यांच्याच हस्ते झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

दोन दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्य सरकारवर आरोप करताना राज्यात सर्कस चालू असल्याची टीका केली होती. त्याला श्री. पवार यांनी काल कोकणच्या दौऱ्यात प्रत्युत्तर देताना श्री. पवार यांनी "आमच्याकडे सर्कस आहे, त्यात प्राणी आहेत पण विदूषक नाही' अशी बोचरी टीका केली होती. या दोघांच्या वादात आता श्री. पाटील यांनी उडी घेताना श्री. पवार यांच्यावर टीका केली आहे. 

आपल्याला श्री. पवार यांच्याविषयी आदर असून अनेकदा दिल्लीत जाऊन त्यांचे मी मार्गदर्शन घेतल्याचेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापेक्षा श्री. पवार यांच्याविषयी मला जास्त आदर आहे, असेही श्री. पाटील यावेळी म्हणाले. 

श्री. पाटील म्हणाले,"श्री. पवार हे मोठे आहेत, त्यांच्यावर वारंवार टिपण करतो याचा अर्थ मी त्यांचा अनादर करतो असा होतो. पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात कधीही अनादर नाही तर आदरच आहे. कोकणात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी सर्वप्रथम विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर गेले, त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि लगेच श्री. पवार हेही दौऱ्यावर आले. आम्ही गेल्यावर मात्र टीका झाली.' 
श्री. पाटील म्हणाले,"केंद्रीयमंत्री राजनाथसिंह यांनी बोलल्यानंतर श्री. पवार विदूषक म्हटले, प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. पण एवढे तरी बरे की श्री. पवार यांनी त्यांच्याकडे सर्कस आहे एवढे तरी मान्य केले आणि जे कोणी त्यात आहेत ते प्राणी आहेत हेही मान्य केले. यावर लगेच श्री. आव्हाड काही तरी बोलतील पण सर्कस आहे हे मी म्हटलेलो नाही तर श्री. पवार यांनीच ते मान्य केले आहे. श्री. पवार यांच्याविषयी माझ्या मनात जेवढा आदर आहे तेवढा श्री. आव्हाड यांच्या मनात आहे का नाही हे मला माहित नाही.' 

हे पण वाचा - शरद पवार यांचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना जबरदस्त टोला! वाचा काय म्हणाले?

ते म्हणाले, "गेल्या पाच वर्षात श्री. पवार यांची अनेकदा दिल्लीत भेट घेतली आहे. श्री. पवार यांचे साखर उद्योग, शेतीबद्दलचे ज्ञान याविषयी कोणाच्या मनात शंका नाही. शेवटी राजकारणात एकाने एक बॉल मारला तर दुसरा दुसरा बॉल मारतो असे होते. पण ते दिर्घकाळ लक्षात ठेवण्यासारखे नसते. श्री. राजनाथसिंह यांनी एका अर्थाने तीन पक्षाचे सरकार जे चालले आहे असे म्हटले, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यातून त्यांनी यावर सर्कस अशी टीका केली आहे. त्यावर श्री. पवार यांनी सर्कस आहे, प्राणी आहेत फक्त विदूषक पाहीजे असे सांगत सर्कस आहे तरी मान्य केले.' 

हे पण वाचा - हृदयाचा ठोकाच चुकला, वडिलांसमोरच बाळाने धरले नागाचे शेपूट... व्हिडीओ होतोय व्हायरल...  

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा