मराठा समाजास केंद्र सरकारच्या ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांची भेट हे घेणार भेट

सुयोग घाटगे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ज्या घटकांना कोणत्याही मागास प्रवर्गातील आरक्षणांचा लाभ किंवा सोयीसुविधेचा फायदा दिला जात नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांचा यात समावेश आहे. 

कोल्हापूर : मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी, राज्यात आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. 
केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा लाभ राज्यात मराठा समाजाला मिळणार नाही, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ज्या घटकांना कोणत्याही मागास प्रवर्गातील आरक्षणांचा लाभ किंवा सोयीसुविधेचा फायदा दिला जात नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांचा यात समावेश आहे. 
केंद्र शासनाच्या मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश नाही. त्यामुळे केंद्र शासनामधील नागरी सेवा व पदे यामध्ये सरळसेवा प्रवेशासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणासाठी मराठा समाज पात्र आहे. राज्यात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास या प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षणाचा लाभ राज्यातील शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाच्या जागा यामध्ये घेता येणार नाही, असे परिपत्रक शासनाने काढले आहे. याबाबत मराठा समाजामध्ये संताप व्यक्त होत आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची भक्कम बाजू राज्य सरकार मांडेल. आरक्षण टिकवण्यासाठी जे जे करता येईल ते ते राज्य सरकार करत आहे. याबाबतच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबधितांना दिल्या आहेत. त्यामुळे नक्कीच ते केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा लाभ राज्यात मराठा समाजाला देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतील, यात शंका नसल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.मराठा समाजास केंद्र सरकारच्या ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांची भेट हे घेणार भेट

संपादन ः यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Chief Minister's visit to the Maratha community for the EWS reservation of the Central Government will be a meeting