सिनेमा थिएटर्सही डिसेंबरनंतरच खुली होण्याची शक्‍यता 

 Cinema theaters are also expected to open after December
Cinema theaters are also expected to open after December
Updated on

कोल्हापूर  : मराठी रंगभूमीदिनाच्या पूर्वसंध्येला शासनाने राज्यातील नाट्यगृहे सुरू करण्यासाठी परवानगी दिली, पण कोल्हापूरचा विचार केला तर नाट्यगृहे कधी खुली होणार, हा प्रश्‍न अजूनही कायम आहे. प्रशासकीय पातळीवर अजूनही नाट्यगृह सुरू करण्यासाठीच्या हालचाली नाहीत. दरम्यान, शहर आणि जिल्ह्यातील सिनेमा थिएटर्सही डिसेंबरनंतरच खुली होतील, असे सध्या तरी चित्र आहे. कारण तूर्तास नवे सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी कुणीच निर्माता व वितरक तयार नाहीत आणि जुने सिनेमे दाखवले तर ते कितपत परवडणार, असा थिएटरमालकांसमोरचा प्रश्‍न आहे. 

नाट्य वितरकांचा विचार केला तर एकूण आसन संख्येच्या किती टक्के खुर्च्या विकता येतील? सोशल डिस्टन्सिंगचे नियम कसे असतील? ग्रीन रूम्सचे सोशल डिस्टन्सिंग कसे ठेवता येईल, याचे नियम कसे असतील, नाटक सुरू होण्यापूर्वी व संपल्यानंतर नाट्यगृह सॅनिटाईझ करावे लागेल काय, त्याचा खर्च कुणी सोसायचा, शासकीय नियम, निम्मी आसन संख्याच वापरण्याचा झाला तर एकंदर प्लॅन किती रुपयांचा लागेल व त्यात होणाऱ्या उत्पन्नात नाट्यप्रयोग करणे परवडेल काय, तिकीट दर वाढले तर ते चालेल काय, सोशल डिस्टन्सिंगमुळे निम्मी तिकिटे विकण्याची सक्ती झाली तर नाट्यगृहाचे भाडे निम्मे घेतले जाईल का, असे अनेक प्रश्‍न त्यांच्यासमोर आहेत. 

केशवराव भोसलेमधील प्रलंबित प्रश्‍न 
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा विचार केला तर नाट्यगृहातील अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नव्या नियुक्‍त्या झालेल्या नाहीत. नाट्यगृहाला अद्यापही साऊंड ऑपरेटर नाही. स्वच्छतागृह, तिकीट खिडकींबाबतचे प्रश्‍नही प्रलंबित आहेत. त्याशिवाय सर्व नियम पाळून नाट्यगृह सुरू करायचे म्हटले तरी महापालिकेला भाडे कमी करणे अशक्‍य आहे आणि आयोजकांना इतके भाडे देणे परवडणारे नाही, असेच चित्र सध्या तरी आहे. 


संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील अनेक प्रश्‍न अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे लगेच येथे कितपत प्रयोग सुरू होतील, याची शक्‍यता कमी आहे. महापालिकेने तत्काळ प्रलंबित कामांना प्राधान्य दिले पाहिजे. 
- आनंद कुलकर्णी, नाट्य परिषद. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com