'दूधगंगे'तून इचलकरंजीस पाणी देण्याचा अजित पवार यांनी फेरविचार करावा ; योजनेस होतोय विरोध...

Citizens along with farmers oppose the plan to supply water to Ichalkaranji from Dudhganga river
Citizens along with farmers oppose the plan to supply water to Ichalkaranji from Dudhganga river

म्हाकवे (कागल) - काळम्मावाडी धरणाच्या पाणी वाटप नियोजनातील कालवे अपूर्ण आहेत. भविष्यात ते पूर्ण झाल्यास पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेरविचार करावा, अशी मागणी कागल तालुका निराधार समितीचे अध्यक्ष धनराज घाटगे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
सध्या या पट्ट्यातील इंच इंच जमीन पाण्याखाली आणली जात आहे. त्यामुळे पाण्याची मागणी प्रचंड प्रमाणात होत आहे; परंतु गैबी बोगद्यातून जाणारे पाणी आणि कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईन यामुळे धरणातील पाणी कमी होणार आहे. इचलकरंजीसाठी दूधगंगेतून उपसा झाल्यास आणखी पाणी कमी पडेल. याचा सर्वांत मोठा फटका वेदगंगा खोऱ्यातील शेतकऱ्यांना बसण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी धरणात साठाच कमी झाला होता. त्यावेळी दूधगंगा व वेदगंगा खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई उद्‌भवली होती. त्यामुळे दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा योजना करण्यास येथील शेतकऱ्यांसह नागरिकांचा विरोध असल्याचेही घाटगे यांनी सांगितले.

काय झालाय निर्णय ?

वारणा नदीतून कोथळीमार्गइचलकरंजी शहराला पाणी देण्याच्या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत इचलकरंजी शहराला वारणा नदी ऐवजी दूधगंगा नदीतून पाणीपुरवठा करण्याचे ठरले होते.

इचलकरंजी शहराला सुळकूड मार्गे दूधगंगा नदीतून पाणी देण्याचे याचबरोबर या योजनेचा आराखडा लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचनाही पवार यांनी दिल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com