esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

close down shops within monday in kolhapur waiting CM decision sellers

निर्णयाची वाट पाहण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर संघटनेच्या व्हीसीमध्ये झाला.

सोमवारपर्यंत राज्यात शटर डाउनच राहणार; आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस देण्याची विनंती केली आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन सोमवार (१२) पर्यंत दुकाने बंद ठेवून त्यांच्या निर्णयाची वाट पाहू, असा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर संघटनेच्या व्हीसीमध्ये झाला. त्यामुळे सोमवार सकाळपर्यंत दुकाने बंदच राहणार आहेत.

दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री  कार्यालयाकडून निर्णय न झाल्यास सोमवारी दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असाही सूर व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींचा होता. त्यानुसार सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला. संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष मंडले अध्यक्षस्थानी होते. वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी निर्णय जाहीर केला. महाराष्ट्र चेंबर ही व्यापाऱ्यांची शिखर संस्था आहे. दुकाने बंदबाबत निर्णय घेण्यासाठी आज सर्व चेंबरच्या अध्यक्षांनी व्हीसीद्वारे संवाद साधला.  

हेही वाचा - धक्कादायक! कोल्हापुरात दोन बहिणींची कौमार्य चाचणी; विवाहानंतर पाठवलं माहेरी

पुण्यासह कोल्हापुरातून व्यापार बंदबाबत तीव्र पडसाद उमटले. व्यापाऱ्यांच्या भावना तीव्र असल्याचे त्यांच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले. बहुतांशी व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना आणखी दोन दिवस वेळ दिला पाहिजे. त्यांच्या विनंतीला मान देऊ. योग्य निर्णय न झाल्यास सोमवार पासून व्यापार सुरू करू अशी भूमिका मांडली. सुमारे तासभाराच्या चर्चेत वीसहून अधिक व्यापाऱ्यांनी मते व्यक्त केली. 

go to top