चार टन कचरा, प्लास्टिक गोळा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

कोविड 19 संसर्गाच्या पाभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. या अंतर्गत आज शहरातील नाले स्वच्छता व औषध फवारणी मोहीम आज राबविण्यात आली. यामध्ये चार टन कचरा, प्लास्टिक गोळा केला.

कोल्हापूर : कोविड 19 संसर्गाच्या पाभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. या अंतर्गत आज शहरातील नाले स्वच्छता व औषध फवारणी मोहीम आज राबविण्यात आली. यामध्ये चार टन कचरा, प्लास्टिक गोळा केला. या मोहिमेचा 57 वा रविवार असून राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सात महिला व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. 

यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक योजनेचा भाग म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्हा सत्र न्यायालय संपूर्ण बिल्डिंग सॅनिटायझर करण्यात येऊन सभोवताली औषध फवारणी केली. तसेच बोंद्रे नगर मातंग वसाहत झोपडपट्टी येथेही स्वच्छता मोहीम घेऊन औषध फवारणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते अशोक देसाई यांनी आयसोलेन येथे कर्मचारी यांना षण्मुख आयुर्वेद औषधाचे वाटप केले. 

ही मोहीम आयसोलेशन हॉस्पिटल परिसर, जयंती पम्पिंग स्टेशन, पंचगंगा नदी घाट, रिलायन्स मॉल मागे, बोंद्रे नगर झोपडपट्टी, रंकाळा तलाव परिसर, कसबा बावडा राजाराम बंधारा या ठिकाणी राबविली. मोहिमेत 5 जेसीबी, 6 डंपर, 6 आरसी गाड्या, 1 पाण्याचा टॅंकर व 2 टॅंकरद्वारे औषध फवारणी करण्यात आली. तसेच महापालिकेच्या 80 स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या साह्याने मोहीम राबविली. 

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त अवधूत कुंभार, चेतन कोंडे, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, डॉ. रमेश जाधव, रमेश मस्कर, डॉ. विजय पाटील, आर. के. पाटील, राम काटकर, सचिन जाधव, जयवंत पोवार, राहुल राजगोळकर, सुशांत कावडे, नंदकुमार पाटील, करण लाटवडेकर, मनोज लोट, स्वप्नील उलपे, शिवाजी शिंदे, अरविंद कांबळे, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, दिलीप देसाई, प्रमोद माजगावकर व कार्यकर्ते, अमित देशपांडे व कर्मचारी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collect four tons of waste, plastic