
कोल्हापूर : जिल्ह्यात शासनातर्फे कोरोनाच्या नियंत्रणासाठी "माझे कुटुंब माझी जबाबदारी', हा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र
कोपार्डे (ता. करवीर) येथे तलाठी यांनाच कोरोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिक किती? याचे उत्तर देता आले नाही. यावरून "माझे कुटुंब माझी जबाबदारी', मोहिमेत खुद तलाठीच बेजबाबदार असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिसून आले, या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला धारेवर धरले.
आज दुपारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कुंभी कारखाना डी. सी. नरके विद्यानिकेतन येथील सुरू होणाऱ्या कोविड सेंटरला भेट दिली. त्यानंतर मोहिमेचे काम पाहण्यासाठी त्यांनी कोपार्डेत अचानक भेट दिली.
या वेळी कोविड रुग्ण असणाऱ्या कुटुंबात भेट देऊन त्यांच्या आरोग्याची चौकशी केली. अन्य दोन कुटुंबांना भेट दिली. या वेळी तलाठी श्रीकांत भोसले यांना गावातील रुग्णांच्या संपर्कातील लोक किती? तुम्हाला काय माहीत आहे का?, असा प्रश्न विचारला, या वेळी तलाठ्यांनी दीड महिना येथे आपन रुजू झाल्याचे सांगितले व रुग्णांच्या संपर्काबाबत असमाधानकारक
उत्तरे दिली. आज ग्रामसेवक गैरहजर होते. दीड महिन्यात सर्व माहिती जवळ हवी होती असे सांगून श्री. देसाई यांनी त्यांची कान उघाडणी केली.
गावातील covid-19 च्या संदर्भात वाढत असलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर त्यांनी स्थानिक प्रशासन, आरोग्यविभाग, आशा सेविका, तलाठी, ग्रामसेवक हे सर्वजण किती जबाबदारीने काम करतात याचीही उलटतपासणी केली.
या वेळी करवीर प्रांत वैभव नावडकर, तहसीलदार शीतल भामरे-मुळे, डॉ. गुणाजी नलवडे, प्रशासक एस. बी. जगताप, मंडळ अधिकारी सुहास घोदे, ए. एम. कलरकर, आर. पी. पारकर, राजाराम चौगले, पोलिसपाटील जालिंदर जामदार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.