शिक्षकांना रंगीत पार्टी पडली चांगलीच महागात; बसला ८३ हजार रुपये दंड

Colorful party in the sanctuary Kolhapur teachers fined Rs 83000
Colorful party in the sanctuary Kolhapur teachers fined Rs 83000

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : अभयारण्यात घुसून हुल्लडबाजी व दारू पार्टी करणाऱ्या कोल्हापुरातील ‘त्या’ शिक्षकांना तब्बल ८३ हजार रुपयांचा दंड वन्यजीव विभागाने ठोठावला. 


काल मध्यरात्री काळम्मावाडी धरण क्षेत्राच्या मागे अतिसंवेदनशील क्षेत्रात हसणेपैकी सतीचा माळ येथील सुरंगी गेटमधून आत गेलेल्या २० लोकांवर कारवाई केली होती. पाच मोटारीतून जंगलात दारू पार्टी करताना वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी नवनाथ कांबळे यांनी पकडले होते. हे सर्व कोल्हापुरातील प्रतिष्ठित असल्याचे समजते.

यांच्यासोबत वनरक्षक होता. त्यांना ८३ हजार दंड केला असून वनरक्षकावर शिस्तभंगाची कारवाई केल्याचे कांबळे यांनी सांगितले. पर्यटनासाठी राधानगरी अभयारण्य व दाजीपूर परिसरात लोकांचा ओढा वाढला असला तरी तलावाच्या काठावर जेवण करण्यास व गोंधळ घालण्यात कडक नियम आहेत. पर्यटन जरूर करावे, मात्र जंगलाचे नियम व शिस्त भंग झाल्यास कारवाई होणारच असे वन्यजीव विभागाने सुचित केले आहे. त्यामुळे ज्यांना निसर्गाची आवड असेल त्यांनी दाजीपूर अभयारण्यकडे वळावे, असा संदेश यातून दिला आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com