दिलासादायक ःदुबईतील भारतीयांना मायदेशी येण्याची संधी

लुमाकांत नलवडे
मंगळवार, 14 जुलै 2020

कोल्हापूर ः दुबईत अडकलेल्या भारतीयांना 13 ते 23 जुलै दरम्यान मायदेशी येण्यासाठी खास व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच ज्या दुबईतील व्यक्तींना कोल्हापुरात थेट यायचे आहे, त्यांनी मुंबईला न उतरता बंगळूरमध्ये उतरल्यास त्यांना कोल्हापुरात विमानाने आणण्याची ही व्यवस्था केली आहे.

कोल्हापूर ः दुबईत अडकलेल्या भारतीयांना 13 ते 23 जुलै दरम्यान मायदेशी येण्यासाठी खास व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच ज्या दुबईतील व्यक्तींना कोल्हापुरात थेट यायचे आहे, त्यांनी मुंबईला न उतरता बंगळूरमध्ये उतरल्यास त्यांना कोल्हापुरात विमानाने आणण्याची ही व्यवस्था केली आहे. मुंबईतून कोल्हापुरात विमानसेवा सध्या सुरू नसल्यामुळे संबंधितांना तेथेच क्वारंटाईन व्हावे लागते. 
व्हीसा संपला, नोकरीचा करार संपला, कायमचे भारतात यायचे आहे, अशा अनेक कारणांवरून दुबईतून मायदेशी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे; मात्र लॉकडाउनमुळे या व्यक्ती येऊ शकत नव्हत्या. यासाठी भारत आणि दुबई सरकारने दुबई-मुंबई-दुबई तसेच दुबई-बंगळूर-दुबई अशा विमानसेवा सुरू केल्या आहेत. सध्यातरी 13 ते 23 जुलै दरम्यान दोन्ही सेवा सुरू राहणार आहेत. ज्यांना दुबईतून कोल्हापुरात यायचे आहे किंवा दुबईला जायचे आहे, अशांसाठी काही विमान कंपन्यांनी खास व्यवस्था केली आहे. तातडीने सुमारे 25-30 हजार रुपयांत ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. 
दुबईतून थेट मुंबईत आल्यास तेथे क्वारंटाईन व्हावे लागते. आणि त्यानंतर कोल्हापुरात येण्यासाठी विमानसेवा सुरू नाही. त्यामुळे कोल्हापुरातून दुबईला जाण्या-येण्यासाठी बंगळूर हा चांगला पर्याय पुढे येत आहे. कोल्हापूर-बंगळूर विमानसेवा सुरू असल्यामुळे दुबई ते कोल्हापूर व्हाया बंगळूर येता येते. तसेच त्यानंतर फक्त कोल्हापुरातच हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जाते. 
 

संपादन - यशवंत केसरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A comforting opportunity for Indians in Dubai to come home