रेडझोनमधून येताय, नियम पाळाच !

Coming from the red zone, follow the rules!
Coming from the red zone, follow the rules!
Updated on

कोल्हापूर : रेडझोनमधून येणाऱ्यांनी क्वारंनटाईनचे नियम पाळावेत, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय व समन्वय अधिकाऱ्यांची निवडणूक कार्यालयात आज व्हेबएक्‍स व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक आयुक्तांनी घेतली. 

आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी रेडझोनमधून येणाऱ्या नागरिकांनी क्वारंनटाईनचे नियम पाळावेत. जे दिवसात जाऊन परत येतात त्यांनी होम क्वारंनटाईन व्हावे, कुटुंबासाठी व शहरासाठी क्वारंटाईनचे नियम पाळावेत, असे आवाहन आयुक्तांनी केले. वैद्यकीय अधिकारी यांनी सर्व्हेक्षणावर अधिक भर द्यावे. शाहू मार्केट यार्ड येथे चोवीस तास स्क्रिनिंगची व्यवस्था सुरू ठेवलेली आहे. 

रेडझोनमधून येणाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक आहे. त्यामुळे होम क्वारंनटाईनसाठी आग्रह धरू नये. रेडझोनमधून येणाऱ्या नागरीकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी सुरक्षित अंतर ठेवावे. त्यांच्या वापरात येणारे अंथरुण, भांडी, स्वंतत्र ठेवावीत. यासाठी संपर्कात येणाऱ्या केअरटेकरांनी हॅण्डग्लोज वापरावेत. होम क्वारंनटाईन असताना संबंधित बाहेर पडणार नाही यासाठी घरच्यांनी काळजी घ्यावी. 

परराज्यातून, परजिल्हयातून आलेले नागरीक परस्पर घरी गेले असतील तर त्यांचा शोध घ्यावा. यासाठी शिक्षक, कार्यकर्ते यांची मदत घ्या. दाट वस्ती असणाऱ्या ठिकाणी दक्ष राहून काम करा. त्याठिकाणी मास्क, सॅनिटाईझर वाटप करा. लोकांचे प्रबोधन होण्यासाठी याठिकाणी जनजागृती करा.

विनामास्क व सोशल डिस्टंन्स न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी सर्व सचिवांना पावती पुस्तक देण्याच्या सूचना उपआयुक्त निखिल मोरे यांना दिल्या. आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, साथरोग अधिकारी डॉ. रमेश जाधव, प्रशासन अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. विद्या काळे व 11 प्राथमीक आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी, समन्वय अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते. 

आयुक्‍त म्हणाले... 
- रेडझोनमधून येणाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक 
- होम क्वारंटाईनसाठी आग्रह नको 
- दिवसात बाहेर जिल्ह्यातून जाऊन येणाऱ्यांनी होम क्वारंटाईन व्हावे 
- परजिल्ह्यातून आलेले परस्पर घरी गेलेल्यांचा शोध घ्यावा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com