व्हाईट आर्मीचे काम प्रेरणादायी ; आयुक्तांनी केले कौतुक

commissioner of kolhapur dr. mallinath kalshetti appreciate to white army in kolhapur
commissioner of kolhapur dr. mallinath kalshetti appreciate to white army in kolhapur
Updated on

कोल्हापूर : कोरोनाच्या काळात लोकांवर वेळीच योग्य उपचार व्हावेत, यासाठी व्हाईट आर्मीने पुढाकार घेतला. प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळे कोरोनाच्या काळात लोकांना मोफत उपचार मिळाले. व्हाईट आर्मीचे हे काम निश्‍चितच प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्‌गार डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी काढले. महापालिका आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर आज त्यांना व्हाईट आर्मीसह विविध संस्थांतर्फे सदिच्छा देण्यासाठी छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

दरम्यान, यावेळी व्हाईट आर्मीच्या मोफत कोविड सेंटरमध्ये यशस्वी उपचार झालेल्या कोरोनाबाधित मातेच्या बाळाचा नामकरण सोहळा झाला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते डॉ. कलशेट्टी यांचा सत्कार झाला. डॉ. कलशेट्टी म्हणाले, "आयुक्त म्हणून अनेक गोष्टी कोल्हापूरसाठी करता आल्या. महापूर आणि कोरोनाच्या काळात प्रशासनाला लोकांची आणि विविध संस्था, संघटनांची सहकार्याची भूमिका मोलाची ठरली. शिवाजी विद्यापीठात शिकलो आणि त्यामुळे मी कोल्हापूरकरच आहे. इथून जरी बदली होत असली तरी कोल्हापूरसाठी म्हणून शक्‍य तेवढ्या सर्व गोष्टींसाठी कायम आग्रही राहीन.'' 

कार्यक्रमाला देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, दिगंबर जैन बोर्डिंगचे सचिव संजय शेटे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के, अरिहंत जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल, रयत शिक्षण संस्थेचे एम. बी. शेख यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी स्वागत केले.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com