साखर कामगारांच्या प्रश्नांबाबत होणार चर्चा ; समितीत तीन नेत्यांचा असणार समावेश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

समितीत जिल्ह्यातील आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार चंद्रदीप नरके व के. पी. पाटील यांचा समावेश आहे.

कोल्हापूर : राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्याबाबत साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, साखर कामगार प्रतिनिधी व शासन प्रतिनिधी यांची त्रिपक्षीय समिती स्थापन केली आहे. समितीत जिल्ह्यातील आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार चंद्रदीप नरके व के. पी. पाटील यांचा समावेश आहे.

माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत २८ जणांचा समावेश आहे. साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी २०१५ मध्ये त्रिपक्षीय समिती स्थापन केली होती.

समिती अशी :

जयप्रकाश दांडेगावकर (अध्यक्ष), सदस्य - श्रीराम शेटे (दिंडोरी), आबासाहेब पाटील (रेणापूर), विजयसिंह मोहिते-पाटील (अकलूज), हर्षवर्धन पाटील (इंदापूर), राजेंद्र नागवडे (श्रीगोंदा), भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर), संजय खताळ (व्यवस्थापकीय संचालक, साखर संघ), बी. बी. ठोंबरे (कळंब), प्रल्हाद साळुंखे (फलटण). कामगार प्रतिनिधी - भाई जगताप, तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले, अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, रावसाहेब पाटील, अशोक बिराजदार, सुरेश मोहिते, आनंदराव वायकर, सुभाष काकुस्ते, अविनाश आदिक, नितीन पवार, पोपटराव मिटकरी, योगेश हंबीर, डी. डी. वाघचौरे.

हेही वाचा - भय्या माने यांची पुणे पदवीधर मतदारसंघातून माघार -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: committee for sugar factory employees questions three people are included for this committee in kolhapur