ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50 हजारांची भरपाई द्यावी ः समरजितसिंह घाटगे

युवराज पाटील -पुलाची शिरोली
Tuesday, 20 October 2020

शिरोली पुलाची, कोल्हापूर : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. 
येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झाले

शिरोली पुलाची, कोल्हापूर : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. 
येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी श्री. घाटगे यांनी केली. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या शौमिका महाडीक, राजेश पाटील, सुरेश पाटील प्रमुख उपस्थिती होते. 
श्री. घाटगे म्हणाले, "" महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मागील सरकारने दहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. या सरकारने वीस हजार कोटीचे पॅकेज जाहीर करून, शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी. या सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना पन्नास हजार अद्यापही मिळाले नाही. सरकारने राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सन्मान जनक पॅकेज जाहीर करून, त्यांच्या बैंक खात्यात पैसे जमा करावेत.'' 
शेतकरी युनूस मुल्ला यांनी शिरोलीत ऊस तोडणी मजुरांची संख्या वाढवण्याची मागणी केली. भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, निवास कदम, कृष्णात करपे, बबन संकपाळ, सतीश पाटील, ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे, दिलीप शिरोळे, मदन संकपाळ, निशिकांत पद्माई, पुष्पा पाटील, तेजस्विनी पाटील, संजय पाटील, एकनाथ संकपाळ आदी उपस्थित होते. 

चिखल तुडवट भातीची पहाणी 
पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता, यामुळे बांधावरूनच नुकसान झालेल्या पिकांची पाहणी समरजितसिंह घाटगे करतील, अशी शक्‍यता गृहीत धरून, सर्व नेते व कार्यकर्ते बांधावर उभे होते ; मात्र श्री. घाटगे चिखल तुडवत थेट भात पिकाचे नुकसान झालेल्या शेतात गेले. यामुळे कपडे, बुटाचा डामडौल बाजूला ठेवत सर्वांनाच चिखल तुडवत शेतात जावे लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Compensation of Rs 50,000 per acre by declaring wet drought: Samarjit Singh Ghatge