अमृत योजनेची कामे मार्चपर्यंत पुर्ण कराः आयुक्त डॉ. कलशेट्टी

Complete the work of Amrut Yojana by March: Commissioner Dr. Kalshetti
Complete the work of Amrut Yojana by March: Commissioner Dr. Kalshetti

कोल्हापूर  : अमृत पाणी पुरवठा व अमृत ड्रेनेज योजनेची कामे पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी विभागाने परस्पर समन्वय ठेवून मार्च 2021 पर्यंत पुर्ण करावीत, अशी सुचना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली 
योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी निवडणूक कार्यालय ताराबाई पार्क येथे संबंधीत अधिकारी व ठेकेदार यांची बैठक आयुक्त डॉ.कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अमृत योजने अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा व ड्रेनेज पाईप लाईनची कामे एस.टी.पी., उंच टाक्‍या, पाईप लाईन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला व या कामामध्ये येणाऱ्या अडचणी आपआपल्या स्तरावर सोडवाव्यात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ताराबाई पार्क, बोंद्रेनगर, आपटेनगर येथील असणाऱ्या टाक्‍यांच्या ठिकाणी या प्रकल्पांअंतर्गत काम करण्यास परवागी मिळावी. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यांनी सकारात्मकता दर्शविल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच कदमवाडी येथील नविन टाकी बांधण्याचे काम हाती घेतले असून त्याठिकाणी असलेला इलेक्‍ट्रीक पोल स्थलांतरीत करण्याच्या कार्यवाहीस प्राधान्य देण्याची सुचना आयुक्त डॉ.कलशेट्टी यांनी केली. 
अमृत पाणी पुरवठा व अमृत ड्रेनेज योजनेची कामे तातडीने पुर्ण करणेसाठी संबधीत विभागानी कृती आराखडा तयार करुन त्यानुसार कामे हाती घ्यावीत. अशी सुचना आयुक्तांनी केली. 
बैठकीस महापालिकेचे जल अभियंता भास्कर कुंभार, शाखा अभियंता आर के पाटील, अरुण गुजर, राजेंद्र हुजरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता पी. एस. गायकवाड, नानिवडेकर, उपअभियंता डी. के. पाटील, शाखा अभियंता सुनिल बसुगडे, दास ऑफशरचे किर्तीकुमार भोजक, नोबल कंपनीचे अविनाश मदने उपस्थित होते.

-संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com