पडळकरांच्या नावाने शंखध्वनी 

Conch sound in the name of Padalkar
Conch sound in the name of Padalkar
Updated on

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज दहन केले. कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या निषेधाच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी निदर्शने केली. पडळकर यांच्या नावाने शंखध्वनी केला. 

पडळकर यांनी काल पवार यांच्यासंबंधी वादग्रस्त विधान केले होते. शहर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवाजी चौकात एकत्रित आले. या वेळी पडळकर यांच्या निषेधाचे फलक हाती घेण्यात आले. या वेळी पडळकर कोण रे.. अशा घोषणा दिल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासंबंधी वादग्रस्त विधान करणाऱ्या पडळकरांचा धिक्कार असो, पडळकर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या गेल्या. संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीनंतर पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. 

शहराध्यक्ष आर. के. पोवार, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, आदिल फरास, माजी नगरसेवक रामदास भाले, संजय कुऱ्हाडे, जयकुमार शिंदे, रमेश पोवार, चंद्रकांत सूर्यवंशी, महादेव पाटील, फिरोज सरगूर, नगरसेवक सुनील पाटील, सुनील देसाई, भीमराव आडके, संजय पडवळे, सुहास साळोखे, सुनील काटकर आदी निदर्शनात सहभागी झाले. 

राष्ट्रवादी दक्षिणतर्फेही निषेध 
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात आज शिवाजी विद्यापीठ परिसरात रास्ता रोको करून पुतळ्याचे दहन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस कोल्हापूर दक्षिणवतीने अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी आमदार पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी सूरज इंगवले, प्रतीक कांबळे, योगेश हातलगे, अतुल शिंदे, गब्बर मुल्ला, शंकर अंभोरे, बैजू पाथरवट, बळवंत माने, सुरज पाटील, नंदलाल संतांनी, सागर सरपटे, सरदार शेख, किरण कदम, दीपक कोरडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri’s 1,160 Km Journey From Vantara to Kolhapur
Madhuri Elephant Nandani Math Return
Dahi Handi Govinda death in Shirol
Topcha Six Lane Flyover Stuck in Contractor Dispute New Tender Process May Delay the Highway Project Further
Marathi News Esakal
www.esakal.com