नियम, अटी इतक्‍या, की हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाऊस बंद ठेवलेलचं बरं... 

conditions so much so hotels should be closed ...
conditions so much so hotels should be closed ...

कोल्हापूर :  मिळकत शून्य आणि खर्च सुरू अशा स्थितीत शहरातील लॉजिग, गेस्ट हाऊस तसेच हॉटेल आजपासून सुरू झाली. ज्या हॉटेलमध्ये निवास व्यवस्था आहे तेथे उपाहारगृहातून जेवण देण्याची अट शासनाने घातली आहे. 

निवास व्यवस्था असलेल्या हॉटेलची संख्या सव्वाशेच्या घरात आहे. छोटेमोठे लॉजिग बोर्डिंग तसेच गेस्ट हाऊसची संख्या दीडशे आहे. थ्री स्टार हॉटेलपासून ते अगदी तीनशे रुपयांपयीत लॉजिंग उपल्बध आहेत. 33 टक्के क्षमता गृहीत धरून हॉटेल सुरू करण्यास परवानगी मिळाली खरी पण त्यासाठी इतक्‍या जाचक अटी लादल्या गेल्या आहेत की हॉटेल सुरू करण्याऐवजी ती बंद ठेवलीच बरी अशा मालकांची अवस्था झाली आहे. चार महिन्यांपासून बंद लॉज आजपासून खुली झाली. जिल्हाबंदीमुळे लोकांची ये-जा बंद आहे. त्यामुळे निवासी हॉटेल आणि लॉज सुरू होऊनही काही फायदा नसल्याचे चित्र आहे. अंबाबाई मंदिर बंद आहे. पर्यटनासही मनाई आहे. अशी स्थितीत हॉटेल तसेच लॉज सुरू केले तरी तेथे मुक्कामासाठी कोणी येणार नाहीत. 

जे लोक लॉजमध्ये नोंदणी करतील त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासावे लागणार आहे. खोली सोडल्यानंतर खोली 24 तास निर्जुतुकीकरण करावी लागणार आहे. ताराबाई रोड, महाद्वार रोड, बाबुजमाल परिसर, लक्ष्मीपुरी येथे लॉजिंग बोर्डिंग आहेत. त्यांचे दरवाजे आजपासून खुले झाले. बसस्थानक परिसरात बड्या हॉटेलची संख्या मोठी आहे. तेही लॉकडाऊनमध्ये अडकले होते. "नो एंट्री' असलेली हॉटेल आजपासून खुली झाली; पण अडचणींना तोंड देतच. 

साडेतीन महिन्यापासून कोरोनामुळे हॉटेल लॉकडाऊन आहेत. आजपासून ती खुली झाली खरी असंख्य अडचणींना तोंड देतच ती मालकांना उघडावी लागली. मिळकत शून्य आणि खर्च सुरू अशी अवस्था हॉटेल तसेच लॉजमालकांची झाली. हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास डिसेंबर अथवा जानेवारीच उजाडेल असे सध्याचे चित्र आहे. 


गेल्या साडेतीन महिन्यांपासून हॉटेल बंद आहेत. 33 टक्के क्षमतेचा वापर करून सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. सुमारे तीन हजार खोल्या उपलब्ध होतील. शासन हळूहळू का असेना पण हॉटेल व्यावसायिकांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. अटी आणि शथींच्या अधीन राहून हॉटेल सुरू करण्यात अडचणी आहेत मात्र मार्ग निघेल. 
- उज्वल नागेशकर, अध्यक्ष, हॉटेल मालक संघ 

दृष्टिक्षेप 
- निवास व्यवस्था असलेली सव्वाशे हॉटेल्स 
- छोटेमोठे लॉजिग बोर्डिंग तसेच गेस्ट हाऊसची संख्या दीडशे 
- थ्री स्टार हॉटेलपासून ते अगदी तीनशे रुपयांपयीत लॉजिंग उपलब्ध 
- जिल्हा बंदीमुळे बाहेरून लोकांची ये-जा बंद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com