कोरोना संकटात यंदा शेतीत  बंपर उत्पादनाचा विश्‍वास ; वाचा सविस्तर.. 

Confidence in bumper production in agriculture this year in the Corona crisis; Read more ..
Confidence in bumper production in agriculture this year in the Corona crisis; Read more ..
Updated on

कोल्हापूर : कोरोनाने जगावर संकट आले. उद्योग, व्यवसाय बंद पडले. पॅकेजची भाषा बंद झाली. पगार अर्ध्यावर आले. लाखो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. यातून बहुतांश लोकांनी गावाकडे धाव घेतली. गावातही कुठे भटकायची सोय नसल्याने व असे भटकल्यास पोलिसांचा मार मिळत असल्याने शेताकडे धाव घेतली. त्यामुळे यावर्षी शेती कामात मनुष्यबळाची कमतरता जाणवली नाही. भांगलणीपासून पिकांना वेळीच खत मिळाल्याने यंदा शेतीतून बंपर उत्पादन निघेल, असा विश्‍वास कृषी विभागाकडून व्यक्‍त होत आहे. 
सुरुवातीचा आठ दिवसांचा लॉकडाउन वगळता शेतीला काही अडचण आली नाही. भाजीपाला, फळे यांची आवक पूर्वीपेक्षा वाढली. नोकरी, व्यवसायानिमित्त जी कुटुंबे वर्षानुवर्षे गावाबाहेर गेली होती, ती कोरोनामुळे गावी दाखल झाली. या कुटुंबांनी शेतात काम करण्याचा आनंद घेतला. यामुळे बघता बघता, बाहेरील मजूर न घेता घरोघरची शेती तणमुक्‍त झाली. वेळीच पेरणी झाली. पिकांना वेळेत लागवड मिळाली. 
कोरोनामुळे नंतर लागवड मिळेल का, याची खात्री नसल्याने शेतकऱ्यांनी दुप्पट लागवड खरेदी केली. त्यामुळे कधी नव्हे ते जिल्ह्यातील युरियाचा खप 157 टक्‍के झाला. आज शेताशेतात भात, ऊस, सोयाबीन, भुईमूग ही पिके डौलानं उभी आहेत. 
कृषी विभागाने केलेल्या नजर अंदाजाने यावर्षी बंपर उत्पादन होण्याची खात्री आहे. 

रिक्षाचालक, टपरीवाले 
बनले भाजी विक्रेते 

कोरोनामुळे लॉकडाउन झाला. उद्योग, व्यवसाय, सार्वजनिक वाहतूक बंद पडली. छोटे-मोठे व्यवसाय करणारे अडचणीत आले. दारोदारी काम करणाऱ्या महिलांनाही घरात बसावे लागले. घरात बसून पोट कसे भरणार, असा कळीचा प्रश्‍न निर्माण झाला. या सर्व संकटात एकमेव शेती, दूध व्यवसाय फक्‍त सुरू होता. त्यामुळे या छोट्या व्यावसायिकांनी भाजीपाला आणि कांदा, बटाटा विकण्यास सुरुवात केली. अशा हजारो कुटुंबांना शेतीनेच आधार दिला. 


शेतीच फक्‍त शाश्‍वत आहे. शेतीत उत्पन्नापेक्षा समाधान आहे. शेती लाख रुपयांचा पगार देणारी नसली तरी कोटभर रुपयांचे समाधान मात्र नक्‍कीच देते. या काळात अनेक उद्योजकांनीही शेती करण्याचा मानस व्यक्‍त केला. कोट्यवधींची मालमत्ता असताना त्यांना शेती करावीशी का वाटते? याचाच अर्थ शेतीत जे समाधान आहे ते अन्य कशातही नाही. त्यामुळे शेतीत आता उच्चशिक्षितांनीही लक्ष देण्याची गरज आहे. 
- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com