Consolation to the entrepreneurs filing of over two and a half thousand laborers
Consolation to the entrepreneurs filing of over two and a half thousand laborers

फाउंड्रीची भट्टी लागली धगधगू ; अडीच हजारांवर मजूरांची झाली एंट्री

नागाव (कोल्हापूर) : श्रमिक रेल्वेने मे महिन्यात गावी गेलेले परप्रांतीय मजूर हळूहळू परत येत आहेत. उद्योगांसाठी मोठी समाधानाची बाब आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाला आणि अडकलेल्या मजुरांना रेल्वेने त्यांच्या गावी रवाना केले. त्यामुळे फाउंड्री उद्योगासमोर संकट उभे होते. परप्रांतीय मजुरांच्या जाण्याने फाउंड्री उद्योगात पोकळी निर्माण झाली होती. उद्योजकांनी कामगार ठेकेदारांमार्फत परप्रांतीय मजुरांशी संपर्क साधून कामावर हजर होण्याची विनंती केली. त्यामुळे मजूर पुन्हा परतू लागले आहेत.

जुलै आणि ऑगस्टमध्ये सुमारे अडीच हजार मजूर परत आल्याचे औद्योगिक क्षेत्रात बोलले जाते. विशेष म्हणजे यातील शेकडो मजुरांना उद्योजकांनी स्वखर्चाने विमानाने आणले आहे. त्यामुळे फाउंड्री उद्योगातील थांबलेल्या फेटलिंग कामाला गती मिळणार आहे. विशेष म्हणजे हे मजूर औद्योगिक वसाहतीशेजारच्या गावांत भाड्याने खोल्या घेऊन राहतात. कारखान्यात पायी ये-जा करतात. कुटुंब गावाकडे असल्यामुळे सोळा-सोळा तास काम करून पैसा मिळवणे हाच त्यांचा छंद असल्याने प्रचंड श्रमाचे काम ते लीलया पार पाडतात.


फाउंड्री उद्योगात उष्ण वातावरणात कष्टाचे काम करावे लागत असल्याने स्थानिक मजूर फार कमी प्रमाणात काम करतात. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार या प्रांतांतील मजुरांनी नॉकऊट ते फेटलिंग या फाउंड्री विभाग ताब्यात घेतला आहे. गुणवत्तापूर्ण कास्टिंगचा पुरवठा करण्यामध्ये कोल्हापूरचा लौकिक आहे. विशेषतः अवजड व्यावसायिक वाहने, ट्रॅक्‍टर आणि जीप यांसारख्या वाहनांना कोल्हापुरातील औद्योगिक क्षेत्रातून शेकडो स्पेअर पार्टस पुरविले जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत कोल्हापूरची कास्टिंग उत्पादन क्षमता कमालीची वाढली आहे.


येथील उद्योजकांना परप्रांतीय मजुरांची उणीव जाणवत होती. फाउंड्री उद्योगात परप्रांतीय मजूर महत्त्वाचा घटक असल्याने उद्योजकांनी लेबर कॉन्ट्रॅक्‍टरमार्फत संपर्क साधला आणि त्यांनीही येण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे काही प्रमाणात उद्योगासमोरील अडचणी कमी होण्याची अपेक्षा आहे.
- निरज झंवर, कार्यकारी संचालक, झंवर ग्रुप 

परप्रांतीय मजुरांनी परत येण्याची तयारी दाखविल्यानंतर त्यांना रेल्वे, खासगी प्रवासी वाहतूक आणि विमानसेवा हे तीन पर्याय उपलब्ध होते; पण रेल्वे वेटिंगमुळे आणि खासगी प्रवासी वाहतूक प्रवासात जादाचा वेळ घेत असल्यामुळे विमानसेवा योग्य ठरली. मजूर वेळेत आले आणि योग्य खबरदारी घेत ते कामावर हजर होतील.
- सुरेंद्र जैन, ज्येष्ठ उद्योजक

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com