Good News : आता घराचे स्वप्न  होणार पुर्ण ; रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’

construction sector of kolhapur got relief building marathi news kolhapur
construction sector of kolhapur got relief building marathi news kolhapur

कोल्हापूर :  शासकीय बाजारमूल्याचे (रेडीरेकनर) दर ‘जैसे थे’ कायम ठेवण्याच्या निर्णयामुळे कोल्हापूरच्या बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाने फ्लॅट, तसेच प्लॉटच्या किमतीत वाढ होणार नाही. 

रेडीरेकनरचे दर हे त्या त्या भागावर अवलंबून असतात. आर्थिक वर्षात कोणत्या भागात दस्त नोंदणीची संख्या अधिक झाली, यावर रेडीरेकनरचे दर अवलंबून असतात. नव्या आर्थिक वर्षापासून किमान पाच टक्‍क्‍यांची वाढ होईल, असे मानले जात होते. हा निर्णय बांधकाम क्षेत्राला अडचणीचा ठरला असता. कोरोना लॉकडाउनचे परिणाम अजूनही कायम आहेत.

दरवाढ कोणत्याही घटकाला परवडणारी नव्हती. याचा परिणाम खरेदी विक्रीच्या व्यवहारावर झाला असता. आता वाढ न झाल्याने आहे त्या दरावर मिळकतींचे मूल्यांकन होईल. लॉकडाउनच्या काळात बांधकाम व्यवसाय अडचणीत आला. खरेदी विक्रीच्या व्यवहारावर परिणाम झाल्याने शासनाच्या महसुलात कपात झाली. अखेर डिसेंबर २०२० अखेर मुद्रांक शुल्क तीन टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले. त्याचा फायदा बांधकाम व्यावसायिक, तसेच शासनालाही झाला. एका फ्लॅटच्या व्यवहारामागे किमान एक लाख साठ हजार इतकी मुद्रांक शुल्कात बचत झाली. लोकांचे घराचे स्वप्न साकार झाले. 

रेडीरेकरनरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. या दरावर बांधकामाचा दर, प्रीमियम, विकासकर अवलंबून असतो. रेकनरमध्ये वाढ झाली की फ्लॅटच्या किमतीत वाढ होते. आता मात्र पूर्वीप्रमाणेच मूल्यांकन होईल. बांधकाम व्यावसायिकांपासून ते सामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे.
-विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, क्रेडाई


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com