कोल्हापूर: सीपीआरमध्ये नॉन कोवीड रूग्णांवर उपचार सुरू 

शिवाजी यादव
Wednesday, 18 November 2020

गेली सहा महिन्या पेक्षा अधिक काळ बंद असलेली वैद्यकीय उपचार सेवा सुरू झाल्याने रूग्णांना दिलासा मिळाला आहे

कोल्हापूर - पूर्ण वेळ कोरोना उपचारासाठी कार्यरत असलेले सीपीआर रूग्णालय आजपासून अपघात विभाग व तातडीच्या शस्त्रक्रिया अशी नॉन कोवीड उपचार सेवा सुरू झाली. परिणामी गेली सहा महिन्या पेक्षा अधिक काळ बंद असलेली वैद्यकीय उपचार सेवा सुरू झाल्याने रूग्णांना दिलासा मिळाला आहे. 

गेली सहा महिने सीपीआरमध्ये फक्त गंभीर अवस्थेतील कोरोना बाधितांवर उपचार होत होते. त्यामुळे अन्य आजारातील रूग्ण व जखमींवर उपचार करण्यासाठी सेवा रूग्णालय अथवा खासगी रूग्णालयात जावे लागत होते. यातून अनेकदा गैरसोय सोसावी लागत होती. अशात अर्थिक दृष्ठ्या दुर्बल घटकांना खासगी रूग्णालयात शुल्क भरून उपचार करणे मुश्‍कील होत होत. अशात कोरोनाबाधितांची संख्याही घटत आली. त्यामुळे सीपीआर मधील कोरोना उपचाराचा ताणही कमी झाला. सध्या सिपीआर रूग्णालयात 62 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

त्यांच्यासाठी एक इमारत स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. 
हीच बाब विचारात घेऊन सीपीआर मधील अपघात विभागात पून्हा सुरू केला आहे. येथे गंभीर रूग्णांची उपचारासाठी दखल घेतली जाणार आहे. याशिवाय तातडीच्या शस्त्रक्रिया पहिल्या टप्प्यात सुरू होतील तर बालरोग उपचार विभाग, प्रसुती उपचार व हृदयरोग उपचार सेवाही सुरू आहेत. त्यामुळे रूग्णांना दिलासा मिळाला आहे. 

हे पण वाचाकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबले महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य 

 
"सीपीआर मधील अपघात विभागात रूग्ण तपासणी व अन्य इमरजन्सीच्या केस तपासल्या जातील. तातडीच्या शस्त्रक्रियाही सुरू करण्यात आल्या आहेत. प्रसुती व बालरोग विभागही सुरू आहे.'' 
-डॉ. राहूल बडे, वैद्यकीय अधिक्षक सीपीआर 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Continue treatment on no ncovid patients in CPR