सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत की गाणं म्हणत ! 

corona effect on sugarcane workers in kolhapur district
corona effect on sugarcane workers in kolhapur district
Updated on

नृसिंहवाडी - "तुम्हीच ठरवा... डोळे भरून तुमची आठवण... कोणीतरी काढते ना... सांगा कसं जगायचं..." या मंगेश पाडगावकरांची कवितेची आठवण आज प्रकर्षाने झाल्या वाचून राहत नाही. याचा प्रत्यय आला, तो म्हणजे औरवाड, कंवठेगुलद, नृसिंहवाडी रस्त्यावरील विविध साखर कारखान्याचे शंभरहून अधिक ऊस तोड मजूर वर्गाच्या दहाहून अधिक टोळीच्या वस्तीला भेट देऊन त्यांची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर. साधारणपणे उस्मानाबाद, बीड, मंगळवेढा, विजापूर, अथणी या भागातील अनेक मजूर पाठीवर विंचवाचे बिऱ्हाड घेतलयाप्रमाणे हंगाम संपल्यानंतरही म्हणजे गेल्या दहा दिवसांपासून पोटाची खळगी भरण्यासाठी व जगण्यासाठी संचारबंदीमुळे कमालीचा संघर्ष त्यांना पाऊला गणिक करावा लागत आहे.

जोंधळे भिजवून तिकटमीट लावून खाण्याची विपरीत वेळ

दरम्यान, दहा दिवसात त्याचे पोटापाण्यासह खर्चाच्या ताळेबंदासह अतोनात हाल होत आहेत. कारण होतं नव्हतं ते साठवून ठेवलेले ज्वारी व बाजरीची पोती रिकामी झाली. जेवणाचा पत्ता नाही ना खायलाही भाजी नाही. परवा संचारबंदीत कारखान्यांनी जे धान्य दिले तेही दळणयासाठी जाताना पोलीसांकडून अडवले जातय.कारण धान्य दळप दुकानेही दोन चार किलोमीटर अंतरावर आहेत. अधून कधीतरी पाऊस पडला की चूलही साथ देत नाही. स्वयंपाकसाठी साध जळण नाही ना काटूक. जोंधळे भिजवून तिकटमीट लावून खाण्याची विपरीत वेळ त्याच्यावर आली आहे. यावर्षी तब्बल पाच महिने गळीत हंगाम पूर्ण करूनही परतीच्या प्रवासात संचारबंदीमुळे आमच्या सारख्या अनेक ऊसतोडणी मजूरांची एप्रिल महिन्यात ही आवस्था दयनीय झाली आहे. तसेच मूक्या जनावराचे चाऱ्या शिवाय अतोनात हाल होत असल्याचे ऊस तोडणी मजूर मुनीर शेख, सुदर्शन लोंढे रमेश गिरी, पंडित हाके (बीड) रूकमणी नाटकर, उषा सांगळे (बार्शी) यांना सकाळ प्रतिनिधीशी बोलताना गहिवरून आलं. 

गावाकडची ओढ

नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात ऊसाचा गळीत हंगाम सुरू होतो. आणि शिवारात मोकळ्या जागेत राहण्यासाठी वस्त्या उभ्या राहतात. दरवर्षी मार्च च्या मध्यावर हंगाम संपला की मजूर गावी घामाचा दाम मोजत आनंदाने निघून जातात. मात्र आज  गावाकडची ओढ लागली असली तरी कोरोना प्रादुर्भावात लॉकडाऊन व संचारबंदी मुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडत आहे.

अशा संकटकाळी कारखाना प्रशासनाने साधी विचारपूसही केली नाही की मदत केली नाही.  अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राहण्याची ठिकाणे सोडायची नसल्याने त्याचा वाहना पुढे आता सातशे ते आठशे किलो मीटर अंतरचा टप्पा गाठण्याची आस आहे.

संचारबंदी लागू करण्यात आल्याने आमच्या ऊस तोड मजूर वर्गाची दयनीय अवस्था झाली आहे.  पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. संचारबंदी उलटल्यानंतर कारखान्यांनी आम्हाला रितसर पञ देऊन गावी सोडावी एवढीच कळकळीची विनंती आहे. 

मुनीर शेख, बंकट जगताप - ऊस तोड मजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com