esakal | गडहिंग्लज शहरासह अकरा गावांत कोरोना

बोलून बातमी शोधा

Corona In Eleven Villages, Including The Town Of Gadhinglaj Kolhapur Marathi News

गडहिंग्लज तालुक्‍यातील कोरोनाच्या एंट्रीला 16 मे रोजी वर्षपूर्ती होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षात दीड महिना आधीच म्हणजे मार्च अखेर व एप्रिलमध्येच कोरोनाचा प्रवेश तालुक्‍यात झाला आहे.

गडहिंग्लज शहरासह अकरा गावांत कोरोना
sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्‍यातील कोरोनाच्या एंट्रीला 16 मे रोजी वर्षपूर्ती होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षात दीड महिना आधीच म्हणजे मार्च अखेर व एप्रिलमध्येच कोरोनाचा प्रवेश तालुक्‍यात झाला आहे. तालुक्‍यात 1 एप्रिलपासून रोजच कोरोना दस्तक देत असून नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज दर्शवित आहे. सध्या शहरासह 11 गावांमध्ये 45 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 

कोरोनाची दुसरी लाट आपण समजतो इतकी साधी नाही, हे अनेक तज्ञांनी जाहीर केले आहे. गडहिंग्लज शहर आणि तालुक्‍यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या अत्यल्प असली तरी रोज नियमित रुग्णांचा आढळ होणे हा धोक्‍याचाच इशारा आहे. प्रशासन आपल्या तयारीला लागले आहे. परंतु शहरासह गावागावातील लोक कधी जागे होणार हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. शासनाने 6 एप्रिलपासून अनेक निर्बंध आणले आहेत. 

विकेंड लॉकडाऊन व्यतिरिक्त सोमवार ते शुक्रवार दुकाने बंदची हाक दिली आहे. परंतु होणाऱ्या आर्थिक नुकसानीला घाबरुन व्यापाऱ्यांचा बंदला विरोध आहे. गेले तीन दिवस व्यापाऱ्यांनी कारवाईला भित दुकाने बंद केली. परंतु शहरातील गर्दी कमी झाली का, या प्रश्‍नाचे उत्तर नाही हेच राहील. यामुळे ग्रामीण अर्थचक्र सुरु ठेवून निर्बंधांच्या अंमलबजावणीवर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.

तालुक्‍यात 1 एप्रिलपासून रोजच रुग्णांचा आढळ होत आहे. बाधिताच्या यादीत नव्या गावांची भर पडत आहे. म्हणजेच कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय. अशा परिस्थितीत गावपातळीवर ग्राम दक्षता आणि शहरातील प्रभाग समित्या ऍक्‍टीव्ह होण्याची गरज आहे. शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात गती यायला हवी. गावे संसर्गापासून वाचविणे अत्यावश्‍यक आहे. यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही कोरोना काळातील लढा अखंडीत ठेवणे हाच पर्याय समोर आहे. 

या गावात कोरोनाचा शिरकाव... 
गडहिंग्लज शहरासह मुगळी, नेसरी, ऐनापूर, बेळगुंदी, बड्याचीवाडी, हलकर्णी, कडगाव, महागाव, दुंडगे, बटकणंगले या गावांमध्ये कोरोनाचे ऍक्‍टीव्ह रुग्ण आहेत. एकूण 45 पैकी शहरात 12 रुग्ण उपचाराखाली आहेत. अत्यल्प लक्षणे असणाऱ्यांना घरी तर, गंभीर रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

रोजच्या रुग्णांचा आलेख... 
1 एप्रिल : 8 
2 एप्रिल : 12 
3 एप्रिल : 2 
4 एप्रिल : 1 
5 एप्रिल : 2 
6 एप्रिल : 16 
7 एप्रिल : 1 
8 एप्रिल : 2 

संपादन - सचिन चराटी

kolhapur