अबब : कोल्हापुरात कोरोना लढ्यासाठी आत्ताच 35 कोटींवर झाला खर्च

Corona fight in Kolhapur has just costs Rs 35 crore
Corona fight in Kolhapur has just costs Rs 35 crore
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार व संसर्ग रोखणे, रुग्णांचे स्वॅब घेणे व चाचणी, जंतुनाशकांची फवारणी, कोविड केअर सेंटरसाठी विविध साहित्य खरेदी आदींसाठी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 35 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये पीपीई किट, एन 95 मास्क, त्रिस्तरीय मास्क, हॅण्ड सॅनिटायझर अशा 27 प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. या सर्व खरेदीच्या निविदा प्रक्रियेबाबतची माहिती मात्र समजू शकलेली नाही. 

कोरोनाविरोधातील लढाईसाठी लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था सक्रिय झाल्या आहेत. त्यासाठी विविध साहित्याची खरेदी करणे सुरू आहे. कोरोनामध्ये सर्वाधिक वापर सुरू आहे तो पीपीई किट व एन 95 मास्कचा. दोन्हीही साहित्यांची जवळपास दोन लाखांच्या घरात खरेदी सुरू आहे. आतापर्यंत 60 पेक्षा अधिक पुरवठादारांनी 10 जूनपर्यंत 133 प्रकारचे साहित्य पुरवले आहे. 

झालेली साहित्य खरेदी 
बुधवार (ता. 10)अखेर 27 प्रकारच्या साहित्याची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये पीपीई किट, एन 95 मास्क, सॅनिटायझर डिस्पेन्सर, प्रिमियम कलर डॉपलर अल्ट्रासाउंड सिस्टम, पीसीआर किट, नॉन सर्जिकल मास्क, थ्री व फाईव्ह लेअर मास्क, डिजिटल थर्मामीटर, नोझ मास्क, व्हेंटिलेटर, थर्मल स्कॅनर, फेस शिल्ड, ग्लोव्हज, व्हीटीएम किट, पल्स ऑक्‍सिमेटर, सॅनिटायझर, सोडियम हायड्रोक्‍लोरोक्‍वीन, स्वॅब टेस्टिंग किट आदी साहित्याचा समावेश आहे. 

दरामध्ये मोठा फरक 
कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतर त्या अनुषंगाने विविध साहित्यांची मागणी अचानक वाढली. त्यामुळे मिळेल त्या दरात साहित्य खरेदी करण्यात आले. सुरुवातीला जे पीपीई किट एक हजार ते 1100 रुपयांना खरेदी करण्यात आले, ते आता 700 वरुन 450 रुपयांपर्यंत खाली आले आहे. सुरुवातीला एन 95 मास्कची खरेदी 220 रुपयांना झाली. त्याची किंमत आता 190, 100 वरून 43 रुपयांपर्यंत खाली आली आहे. जवळपास सर्वच साहित्याचे दर असे घसरले आहेत. 


कोरोनाचा अचानक शिरकाव झाला. प्रतिबंधासाठी आवश्‍यक साधन सामुग्रीची टंचाई होती. ज्या ठिकाणाहून मिळेल ते साहित्य खरेदी करण्यात आले. कोरोनाचा लढा लांबण्याची भीती आहे. यातच पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे यापुढेही अनेक अडचणींची शक्‍यता आहे. त्यामुळे साहित्य खरेदी केले आहे. काही साहित्याचा अजून वापर झाला नसला तरी ते साहित्य तालुका स्तरावर वितरित करण्यात आले आहे. गेल्या दीड महिन्यात आवश्‍यक साहित्याच्या दरात बरीच घसरण झाली आहे. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com