ब्रेकिंग - आधी मुलाला मग पित्याला ही झाली कोरोनाची लागण ; बेळगाव जिल्ह्यात झाले आठ कोरोनाग्रस्त... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

हिरेबागेवाडी येथे कोरोनाबाधित मुलाच्या संपर्कात आल्यानंतर पित्याला देखिल कोरोनाची लागण झाली आहे.

बेळगाव - हिरेबागेवाडी येथे कोरोनाबाधित मुलाच्या संपर्कात आल्यानंतर पित्याला देखिल कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हिरेबागेवाडी गावातील कोरोनाबाधितांची संख्या आता दोनवर पोचली असून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आठ झाली आहे. आरोग्य खात्याने याला पुष्टी दिली असून जिल्हा प्रशासनाने देखिल त्याच्या प्रतिबंधासाठी आजपासून (ता. 9) कठोर पाऊले उचलली आहेत. 

नवी दिल्लीमध्ये तबलीग जमातीच्या निजामुद्दीन मरकज येथे बेळगावातून देखिल काहींनी सहभाग घेतला होता. तेथून परतलेल्यांपैकी बेळगावात तालुक्‍यातील तीघांची 3 एप्रिल रोजी तपासणी केली असता चाचणी पॉसिटीव्ह आली होती. यात बेळगुंदी येथील 76 वर्षीय वृद्धासह कॅम्पमधीळ 26 वर्षीय तर, हिरेबागेवाडीतील 20 वर्षीय तरुणाचा समावेश होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना देखिल जिल्हा प्रशासनाने क्वॉरंटाईन केले होते. यातील 20 वर्षीय हिरेबागेवाडीतील तरुणाच्या वडीलांना देखिल कोरोनाची लागण झाल्याने आता स्पष्ट झाले आहे. दोनच दिवसापूर्वी रायबाग तालुक्‍यातील कुडची येथे देखिल चौघे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता ही संख्या आठवर पोचली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona infected son and father in hirebagewadi