कोल्हापूर ; कुरूंदवाडमधील बाधिताच्या कुटुंबातील सात जणांना कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

सात पॉझिटीव्ह रुग्णांमुळे गोठणासह शहरात भीतीचे वातावरण असून शहराची वाटचाल हॉटस्पॉटच्या दिशेने सुरु झाली आहे. 

कुरुंदवाड - शहरातील गोठणपूर परिसरातील  कोरोणाग्रस्ताच्या कुटुंबातील सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज सोमवारी पालिकेला प्राप्त झाला आहे. अद्याप कांहीजणांचे अहवाल यायचे असून आज गोठणपूरातील सात पॉझिटीव्ह रुग्णांमुळे गोठणासह शहरात भीतीचे वातावरण असून शहराची वाटचाल हॉटस्पॉटच्या दिशेने सुरु झाली आहे. 

 कुरुंदवाड शहर व परिसरात तीस रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. चार दिवसापूर्वी गोठणपूर परिसरातील मिळून आलेल्या कोरोना रुग्णाच्या कुटुंबातील चौदा जणांचे व इतर दोन रुग्णांच्या अशा एकूण तीन  रुग्णांच्या संपर्कातील ३७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी काहींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर गोठणपूर परिसरातील सात जणांना कोरोणाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे.

याबाबत वैद्यकिय अधिकारी डॉ. तराळ म्हणाल्या, येथील एक जण इचलकरंजीतील नातेवाइकांकडे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेला होता. त्याच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती. त्यांच्या घरी एक महिला गेली होती, तिलाही कोरोना झाला, अशाप्रकारे त्याची व्याप्ती वाढत आहे. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

हे पण वाचा - कोल्हापूरात लॉकडाऊन नाही : पालकमंत्री सतेज पाटील 

 कुरुंदवाड शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच चालल्याने शहराची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. संपूर्ण शहर भीतीच्या छायेत आहे. यातील दोन रुग्ण औषद्यउपचार घेऊन बरे झाल्याचे समजते. पालिकेने पुन्हा शहर निर्जंतुकीकरण केले आहे. मास्क सॅनिटायझेरचा नेहमी वापर आणि सोशल डिस्टन्स कायम रहावा या दृष्टीने तपास पथक मोहीम तीव्र केली आहे. आज दिवसभरात 6 हजार रुपये दंड वसूल केला आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. अलगिकरनाचा नियम मोडणांऱ्याची गय केली जाणार नसल्याचा इशारा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona infection of seven family members in kolhapur kurundwad