कोरोना संकटांचा डोंगर, तरीही ताठ मानेने जगायचं आहे

लुमाकांत नलवडे
Saturday, 19 September 2020

कोल्हापूर ः कोरोना महामारीत नोकरी गेली. अनेकांना पन्नास टक्के पगारावर काम करावे लागत आहे. धंदा-व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालत नाही. 92 रुपयांचे खाद्यतेल 120 रुपये लिटर झाले आहे. भाजी 70-80 रुपये किलो झाली आहे. यातच डेंगी, चिकनगुनिया यांसारखे आजार डोके वर काढत आहेत. कोरोनावरील उपचाराच्या बिलाने तर डोळे फिरत आहेत. यातून जगायचं कसं, असा प्रश्‍न घरोघरी सतावत आहे. संकटांचा डोंगर आहे, तरी पुन्हा पहाटेच्या सोनेरी किरणांची वाट पाहायची आहे. एकमेकांना आशेची ऊर्जा देत जगायचं आहे. 

गेले सहा महिने कोरोना महामारीने जगायचं कसं, जगायला काय लागते हे शिकविले; मात्र आता जगायचं कसं, असा प्रश्‍न पुढे येत आहे. मार्च 2020 मध्ये लॉकडाउन झाले. तेव्हा याची झळ घरातील चुलीपर्यंत बसेल, असे वाटले नव्हते. आता त्याची झळ प्रत्येक घरोघरी जाणवू लागली आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींना 50 टक्के पगारावर काम करावे लागत आहे. यामध्येच महागाईचा भडका उडाला आहे. खिशात पैसे कमी असताना महागाईशी कसेबसे सामोरे जात असतानाच चिकनगुनिया, डेंगी यांसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामध्ये पैसे खर्च होत आहेत. काही काम करायचे म्हटले तर कोरोनाची भीती आहे. कोरोनावर खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पैसे नाहीत. तेथील उपचाराची बिले पाहूनही अनेकांचे डोळे फिरत आहेत. 
------------------------ 
भाजी, तेल वाढले 
भाजीचे दरही आता चाळीस-पन्नास रुपये किलोवरून 70-80 रुपये किलोपर्यंत पोचले आहेत. लॉकडाउनपूर्वी 92 रुपये किलो असलेले सूर्यफुल तेल आज 120 रुपये लिटर झाले आहे. कडधान्ये दीडशे ते अडिचशे रुपयांपर्यंत पोचली आहेत. 

कोट 
सोशल मीडियावर उद्योगपती रतन टाटांचे एक वाक्‍य व्हायरल झाले आहे. "यावर्षी केवळ जगायचे, नफा-तोटा पाहायचा नाही.' याच वाक्‍याप्रमाणे आता केवळ जगायचे आहे. कोरोना महामारीच्या अंधकारमय वातावरणातही पहाटेच्या सोनेरी किरणांची वाट पाहून नवी ऊर्जा घेऊन जागायचं आहे. हीच ऊर्जा एकमेकांना द्यायची आहे. 
अम्रपाली रोहिदास, मानसशास्त्रज्ज्ञ, समुपदेशक. 

पदार्थ लॉकडाउनपूर्वीचा दर सध्याचा दर 
सूर्यफुल तेल 95-100 रु. लिटर 125 रु. लिटर 
तूरडाळ 90 रु. किलो 100 रु. किलो 
टोमॅटो 35-45 रु. किलो 15-20 किलो 
श्रावण घेवडा 40 रु. किलो 60-80 रु. किलो 
बटाटा 40-50 रु. किलो 20-25 रु. किलो 
लसूण 80-90 रु. किलो 180-200 रु. किलो 
मेथी पेंडी 10 रु. पेंडी 20-25 रु. पेंडी 
अंडी 4.50 रुपये 07.00 रुपये. 

सामान्यांची स्थिती 
केबल दर कमी झाले नाहीत. 
पेट्रोल-डिझेल दर वाढले. 
औषधांसह इम्युनिटीसाठी इतर खर्च वाढला. 
गरजा मर्यादित करूनही खर्चाचा ताळमेळ बसेना. 
पर्यायी व्यवसायाचे शोध सुरू. 
मोबाईल रिचार्जही वाढला. 
थकीत वीज बिले भरण्यासाठी होते दमछाक.

संपादन - यशवंत केसरकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona is a mountain of troubles, yet she wants to live with a stiff neck