कोरोना रूग्णांवर योग्य उपचार होतोय की नाही, आता समजणार... 

Corona patients are being treated properly or not
Corona patients are being treated properly or not

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व कोरोना रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसवला जाणार आहे. रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी याचा वापर होईल. याची तपासणी आणि देखरेख करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती आणि टास्क फोर्स तयार केली जाईल. यानुसार ही टास्क फोर्स कोरोना रुग्णालयांना भेट देऊन योग्य उपचार, नियोजन होते की नाही याचे नियंत्रण असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांच्या 
अध्यक्षतेखाली ही जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन केली आहे. 

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले,""सीपीआर तसेच डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. अतिदक्षता विभाग किंवा वॉर्ड अशा ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे. याचे फुटेज उपचार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्‍टरर्स तसेच प्रशासन यांना दाखवले पाहिजे. रुग्णांवर योग्य उपचार होतो किंवा नाही हे पाहिले जाईल. ही समिती विविध रुग्णालयांना अचानक भेटी देऊन देखरेख करतात. कोव्हिड रुग्णांचं व्यवस्थापन योग्य होते की नाही यावरही नियंत्रण ठेवेल.'' 

ते म्हणाले,""वेळोवेळी त्यात सुधारणा करुन मृत्यूदर कमी ठेवणं हा उद्देश या समितीचा आहे. मृत्यूदर कमी केला जाणार आहे. अतिदक्षता विभागात असणारे रुग्ण, अतीगंभीर रुग्णांबाबत योग्य उपचार दिला जातो का नाही याबाबत विचार विनीमय करुन तपासणी करेल आणि प्रोटोकॉलप्रमाणे उपचार केले जातील याबाबत दक्ष राहील. जिल्ह्यातील इतर कोव्हिड रुग्णालय, कोरोना काळजी केंद्र या ठिकाणीही नियमानूसार उपचार होतो की नाही, लवकर उपचारासाठी आणले जात की नाही याबाबतही ही समिती उपाययोजना सुचवेल. या बाबत आवश्‍यकतेनुसार शासनाकडेही या उपाययोजना सुचवून त्याबाबत प्रशासकीय कार्यवाही करुन सोयीसुविधा उपलब्ध करता येतील.'' 

यावेळी आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील, डॉ. हर्षदा वेदक, डॉ. स्मिता देशपांडे, ऍस्टर आधारचे डॉ. अजय केणी, ऍपर सरस्वतीचे डॉ. गिरीश हिरेगौडर, डॉ. अनिता सैबन्नावर उपस्थित होते. 

दृष्टिक्षेप 
- सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेची अमलबजावणी 
- देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती, टास्क फोर्स 
- समिती सुचवाना उपाययोजना 
- सोयीसुविधा मिळण्यास होणार मदत 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com