Breaking-कोल्हापुरात कोरोनाचा तेरावा बळी ; शिरोळ तालुक्‍यातील वृध्दाचा मृत्यू 

corona positive patient dead in kolhapur shirol
corona positive patient dead in kolhapur shirol
Updated on

शिरोळ - तालुक्‍यातील नांदणी येथील बाधित वृध्दाच्या मृत्यूने परिसर हादरून गेला आहे. कोरोनाचा हा शिरोळ तालुक्‍यातील पहिला बळी आहे. या वृध्दावर नांदणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार झाले होते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरसह रुग्णालयातील नऊ कर्मचारी आणि वृध्दाच्या घरातील 17 जण, अशा एकूण 30 जणांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी कोल्हापूरला पाठविले आहेत. 


संबंधित वृध्द 75 वर्षीय होते. गेले चार दिवस गावातच एका नामांकित रुग्णालयात उपचार घेत होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा गुरुवारी अहवाल पॉझीटिव्ह आला. यानंतर प्रशासनाने रुग्णालयातील डॉक्‍टर कर्मचारी, त्या वृध्दाच्या घरातील सर्वांना कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले. आज या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. 

वृध्दाचा दफनविधी नांदणी येथे सर्व नियम पाळून पूर्ण करण्यात आला. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने, गुरुवारी सायंकाळी तसेच शुक्रवारी सकाळी संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी केली. संपूर्ण गावाच्या सीमा सील केल्या आहेत. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना, गावातील शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे. 

संसर्ग कसा झाला? 
संबंधित वृध्द रक्तदाब आणि दम्याने त्रस्त होते. आठ दिवसांपूर्वी पट्टणकोडोली येथील नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. मयत वृध्दाच्या घरातील लोक उंदीर, मांजर आणि कुत्रा चावल्यानंतर त्यावर देशी औषध देत होते. यामुळे वृध्दास संसर्ग पट्टणकोडोलीमध्ये झाला की, देशी औषध घेण्यास येणाऱ्या नागरिकांच्या संपर्कातून झाला, याचा शोध घेण्यासाठी प्रशासनास कसरत करावी लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Sugar Season 2026
UPI Transaction Charges on Payments
Gokul election 2026 Mahayuti formula in Kolhapur
Amal Mahadik Reveals BJP Strategy After Chandrakant Patil's Crucial Meeting
Marathi News Esakal
www.esakal.com