चंदगडमध्ये नवीन 7 कोरोना बाधित रुग्ण...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

तालुक्यात भितीचे वातावरण, एकूण संख्या १३ वर

चंदगड - तालुक्यात आज आणखी सात नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. हे सर्व जण मुंबई, पुणेहून आलेले आहेत. तालुक्यात बाधितांची संख्या १३ वर पोहचली आहे.
या आधी सहा रुग्ण पॉझीटीव्ह आढळले आहेत. आज एकाच दिवशी नवीन सात रुग्णांची भर पडल्याने तालुक्यात भितीचे वातावरण आहे. आज बोंजूर्डी, नागनवाडी, इब्राहीमपूर येथे प्रत्येकी एक तर तेऊरवाडी व नागवे येथे प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. यामध्ये २७ ते ३६ वयोगटातील पाच तर ५४ ते ६१ वयोगटातील दोघांचा समावेश आहे. प्रशासनाने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या संपर्कातील लोकांनाही ताब्यात घेण्यात येणार आहे. गावातील व्यवहारही देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive patient found in chandgad kolhapur